आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:जि. प. च्या पोटनविडणुकीसाठी आज मतदान; उद्या मतमोजणी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या िरक्त झालेल्या हातरुण सर्कलसाठी रवविारी मतदान होणार आहे. एकाच जागेसाठी नविडणूक होणार असली तरी जुलैमध्ये अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या होणाऱ्या नविडणुकीतील संघर्ष या निकालावरच अवलंबून राहणार आहे. सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे संख्या बळ २४ तर महाविकास आघाडीचे संख्याबळ २३ आहे. मुख्य लढत वंचित बहुजन आघाडी, शविसेना, काँग्रेस, भाजपमध्ये आहे.

हातरूण सर्कलमधून शविसेनेच्या सुनीता सुरेश गोरे (शविसेना) विजयी झाल्या होत्या. मात्र नामनिदर्शेनपत्र सादर करताना गोरे यांनी साेनाळा येथील मालमत्तेचा २०१४-२०१९ पर्यंतच कर भरला नाही. तसेच माेरगाव भाकरे येथील शेत जमिनीचा उल्लेख उर्वरित.

हे उमेदवार कायम
हातरूण सर्कलच्या पोटनिवडणुकीत सात जणांचे अर्ज वैध ठरले होते. दोघांनी अर्ज मागे घेतले होते.निवडणूक रिंगणात कायम उमेदवारांत वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगोकार, भाजपच्या राधिका पाटेकर, शविसेनेच्या अश्विनी गवई, काँग्रेसच्या रशिका इंगळेंसह अपक्ष अनिता भटकर यांचा समावेश आहे.

दोन्ही बाजूने प्रतिष्ठा लागली पणाला
जुलै महिन्यात अध्यक्ष-उपाध्यक्ष व सभापतींची दुसऱ्या टर्मची नविडणूक होणार आहे. सध्या सदस्य संख्य लक्षात घेता वंचित-२४, शविसेना-१३, भाजप-०५, काँग्रेस-४, राकाँ-४, प्रहार-१ आणि दोन अपक्ष, असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे एक-एक सदस्य जुळवणे सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूने आवश्यक राहणार आहे. पोटनविडणुकीत वंचित आणि महाविकास आघाडी या दोघांसाठीही विजयश्री खेचून आणणे गरजेचे आहे.

यामुळे वाढली चुरस
सन २०२० झालेल्या नविडणुकीत मुख्य लढत शविसेना व वंचितमध्ये झाली. मात्र या वेळी चाैरंगी लढत होण्याचे जाणकारांचे मत आहे. गतवेळी प्रमुख चार पक्षांना पुढीलप्रमाणे मते मिळाली होती.
शविसेना:- ३०५३
वंचित बहुजन आघाडी:- २९५६
भाजप:- २१४३
काँग्रेस:- २११६

बातम्या आणखी आहेत...