आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकाचे नुकसान:जिल्ह्यात अतविृष्टीग्रस्तांसाठी 134 पैकी 88 काेटींचे वितरण ; शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतविृष्टीबाधितांसाठी तालुक्यांना १३४ काेटी रुपये वितरीत केल्यानंतरही आतापर्यंत ८८ कोटी ६९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेेत. बाधित १ लाख २० हजार १८८ पैकी ८७ हजार ५९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तालुक्यांना २१ सप्टेंबर राेजी निधी वितरीत झाल्यानंतरही मदत वितरणाची टक्केवारी ६६. ०४ टक्के आहे. दिवाळीनंतरही सर्व शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेच्या लालफितशाहीचा करभार शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे मदतीच्या प्रक्रियेवर नजर टाकल्यास िदसून येते.

जून , जुलै महिन्यात पुरामुळे पिकाचे नुकसान झाले. साेयाबीन, कापूस, मुग, उडीद व फळ पिकांचे नुकसान झाले हाेते. शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची वेळ आली. दरम्यान राज्य सरकारने वाढीव मदत व हेक्टरी मर्यादा दाेनवरून तीन हेक्टरपर्यंत वाढवण्याचा आिण मदतही दुप्पट करण्याचा निर्णय जारी करीत दाेन महिन्यातील पिकांच्या नुकसानासाठी निधी मंजूर झाला हाेता. आतापर्यंत पिक व जमीनीच्या नुकसानासाठी एकूण १३४ काेटी २९ लाख रुपये संबंधित तालुक्यांना वितरीत करण्यात आले.

असे झाले होते नुकसान जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील १ लाख २० हजार १८८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी १३४ कोटी २९ लाख ८ हजार रुपये शासनाने मंजूर केले आहेत. अतविृष्टीचा फटका जिल्ह्यातील ६११ गावांना बसला होता. त्यामध्ये काेरडवाहू क्षेत्र, सिंचनाखालील क्षेत्र, बहुवार्षिक पिकाखालील क्षेत्राचा समावेश आहे.

६६ टक्के मदतीचे वाटप
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत अकोला तालुक्यातील ४८.५८, बार्शीटाकळी तालुक्यातील ४५.४४, अकोट ७५.९१, तेल्हारा ८२.६१, बाळापूर ८१.१८, मूर्तिजापूर ७७.८३ तर पातूर तालुक्यात ९२.२७ टक्के असे एकूण जिल्ह्यात सरासरी ६६.४ टक्के शासकीय मदतीचे वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...