आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्रवण यंत्र वितरण व तपासणी शिबिर रवविारी आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहेत.
जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे मोफत डिजिटल श्रवण यंत्र वितरण शिबिर व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला खा. सुप्रिया सुळे यांची ऑनलाइन उपस्थिती राहणार आहे. आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात येईल. जिल्ह्यात १००० वृक्षांचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे व आमदार अमोल मिटकरी यांनी कळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या २३ वर्षांत केलेल्या ववििध जनहिताच्या योजनांची व कामांची माहिती देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी काळातील सर्व नविडणुका ताकदीने लढवल्या जातील. पक्षाला अधिकाधिक बळकट करण्याचे काम केले जाईल, असेही आमदार मिटकरी यांचे म्हणणे आहे. राकाँच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमात महासचवि आनंद वानखडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शविा मोहोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे परिमल लहाने, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अविनाश चव्हाण सहभागी झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.