आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:भोंगे हटाव आंदोलनाच्या पत्राचे मनसेच्या वतीने शहरात वितरण ; त्रास झाल्यास पोलिसात तक्रार करा

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मशिदीवरील भोंगे बंदीसंदर्भातील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्राच्या वितरणाला प्रारंभ झाला. हे पत्र घरोघरी वाटत आहे.नागरिकांना लिहिलेल्या या पत्र वाटपाच्या निमित्ताने मनपा नविडणुकीसाठी इच्छुकांनी नारळही फोडण्याची तयारीची चर्चा रंगली. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात न्यायालयाने निर्देशानुसार मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी केली होती. सरकारने हे अनधिकृत भोंगे जर काढले नाही तर मनसैनिकांना दुप्पट आवाजात मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवतील, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर भोग्याबाबत मनसेने नागरिकांनाच आवाहन करणारे पत्रक वाटण्याचे जाहीर केले होते. त्याच अनुषंगाने मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळेंनी पत्रकाचे वितरण केले. या वेळी सतीश फाले, सौरभ भगत,अॅड. अजय लोंढे, सचिन गव्हाळे,सचिन गालट, डॉ. जय मालोकार,राजेश पिंजरकर, मुकेश धोंडफळे, मिलिंद मुळतकर,वैभव कोहर, आकाश शेजे,सौरभ तविारी उपस्थित होते.

सहभागी व्हावे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता या विषयाचा कायमचा तुकडा पाडू या, असे म्हणत जनजागृतीसाठी एक पत्र मराठी भाषेत काढले. हे पत्रक प्रत्येक घरापर्यंत हे पत्रक पोहचवण्याचा प्रयत्न मनसेतर्फे करण्यात येत आहे. पत्रकात त्यांनी भोंगेबाबत विस्तृत खुलासा केला आहे. सर्वसामान्य जनतेने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मनसेने केले आहे.

हा प्रश्न महत्त्वाचाच राज्यात पाणी टंचाई, शेतकरी आत्मत्या, अपुऱ्या शैक्षणिक-आरोग्य सुविधांचे प्रश्न आहेतच. इंधन दर गगनाला भिडले असून, महागाईने जनता होरपळून निघाली. बेरोजगारीचाही प्रश्न आहे. मात्र मानसिक व सामाजिक शांततेचाही विषय महत्त्वाचा आहे. भोंग्याचा निषय सर्वांनी मिळून सोडवायला हवा, असेही मनसेच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...