आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामशिदीवरील भाेंगे बंदीसंदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्राच्या वितरणाला प्रारंभ झाला आहे. पत्र शहरातील घराेघरी वाटण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना लिहिलेल्या या पत्रक वाटपाच्या निमित्ताने महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी नारळही फोडण्याची तयारी केल्याची चर्चा रंगली आहे.
घेतला पुढाकार
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या मनसेच्या गुडीपाडवा मेळाव्यात न्यायालयाने निर्देशानुसार मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर आता भाेंग्याबाबत मनसेने नागरिकांनाच आवाहन करणारे पत्रक वाटण्याचे जाहीर केले हाेते. त्याच अनुषंगाने मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे पत्रकाचे वितरण केले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, महानगराध्यक्ष सौरभ भगत,शहर सचिव अॅड. अजय लोंढे,अकोला तालुकाध्यक्ष सचिन गव्हाळे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट,उपजिल्हाध्यक्ष मनविसे डॉ. जय मालोकार, राजेश पिंजरकर, मुकेश धोंडफळे, मिलिंद मुळतकर, वैभव कोहर,आकाश शेजे, सौरभ तिवारी आदी मनसैनिक उपस्थित होते.
सामन्यांनी सहभागी व्हावे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता या विषयाचा कायमचा तुकडा पाडू या, असे म्हणत जनजागृतीसाठी एक पत्र मराठी भाषेत काढले. हे पत्रक प्रत्येक घरापर्यंत हे पत्रक पाेहाेचवण्याचा प्रयत्न मनसेतर्फे करण्यात येत आहे. पत्रकात त्यांनी भोंगेबाबत विस्तृत खुलासा केला आहे. सर्वसामान्य जनतेने आंदोलनात सहभागी हाेण्याचे आवाहन मनसेने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.