आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मोहीम:सेवा पंधरवडा अंतर्गत वरुड येथे शिधा पत्रिका वाटप‎

मारेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसील कार्यालयाच्या‎ वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रनेता‎ ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यांतर्गत‎ नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा‎ स्थानिक पातळीवर निपटारा‎ करण्यासाठी विशेष मोहीम‎ राबवण्यात आली. तालुक्यातील‎ अतिशय दुर्गम वरुड येथील पारधी‎ पोडावर शिधापत्रिकांचे पुरवठा‎ निरीक्षक रमेश वाढवे यांच्या हस्ते‎ वितरण करण्यात आले.‎

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा‎ पंधरवड्यांतर्गत राबवण्यात‎ आलेली मोहीम जिल्हाधिकारी‎ अमोल येडगे, जिल्हा पुरवठा‎ अधिकारी सुधाकर पवार,‎ उपविभागीय अधिकारी शरद‎ जावळे, तहसीलदार दीपक पुंडे,‎ निरीक्षण अधिकारी ओंकार पडोळे‎ यांच्या मार्गदर्शनात आयोजित‎ केली होती. कार्यक्रमासाठी तलाठी‎ मनोज चिकनकर, कोतवाल‎ योगेश भट यांनी परिश्रम घेतले.‎

यावेळी पुरवठा निरीक्षक रमेश‎ वाढवे यांनी ग्रामस्थांना शासनाच्या‎ विविध योजनांची माहिती‎ समजावून सांगितली. या वेळी‎ सरपंच निर्मला बोंदरे, पोलिस‎ पाटील सुनीता गिरी, रोजगार‎ सेवक कवडू जुमनाके,‎ ग्रामपंचायत सदस्य देविदास भट,‎ शामराव आत्राम, रविता प्रमोद‎ काकडे, ग्रामस्थ, लाभार्थ्यांची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...