आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुष्ठरोग व क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी...:जिल्ह्यात 1042 चमू घेणार रुग्णांचा शोध, 2 लाख 76 हजार घरांना देणार भेटी

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्याकरीता 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या शोधमोहिमेसाठी 1042 आज चमू तयार करण्यात आले असून या चमूंचा माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील 2 लाख 76 हजार 659 घरांना भेटी देऊन एकूण 13 लाख 83 हजार 294 लोकांच्या सर्व्हेव्दारे कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यात येईल.

निदान न झालेले कुष्ठरुग्णांचा तसेच नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण या मोहिमेअंतर्गत शोधून काढण्यात येणार आहे. या करीता जिल्हा व ग्रामस्तरावरील आशा व पुरुष स्वयंसेवक, विविध स्तरावरील पर्यवेक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घराच्या दरवाजावर खूण करण्यात येणार आहे. क्षयरोग रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णांच्या थुंकीचे एक तासाच्या अंतराने दोन नमूने घेण्यात येतील. आवश्यकता वाटल्यास छातीचा एक्स-रे काढण्यात येईल. तसेच कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल.

या आहेत सूचना

  • प्रशिक्षीत पथकाव्दारे गृहभेटी दरम्यान कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाबाबतची माहिती देऊन संशयीत रुग्णांची वेळेत तपासण्या करुन उपचार करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
  • या सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या संदिग्ध रुग्णांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. याबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • शोध मोहिमेतून कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण सुटता कामा नये. याकरीता सुक्ष्मकृती आराखड्यानुसार अभियानाचे नियोजन करण्याचे निर्देश आहेत.

13 ते 30 सप्टेंबरपर्यंत मोहिम

क्षयरोग व कुष्ठरोग रुग्णांच्या या शोधमोहिमेला 13 सप्टेंबरपासून जिल्ह्यात सुरूवात होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मोहिमेसाठी नियुक्त केलेले चमू शहरी आणि ग्रामीण भागात घरोघरी भेट देणार आहेत. दररोज एका चमुमार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...