आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:दीड वर्षानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चार वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या ५४ वर्षीय नराधमाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गणोरकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. हा निकाल शनिवारी दिला. विजय उर्फ फक्कर पुंजाजी खोबरे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो खदान परिसरातील कैलास टेकडी येथे राहतो. १३ डिसेंबर २०२० रोजी पीडित चिमुकलीच्या आईने खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यात तिने आरोप केला होता की, तिच्या चार वर्षाच्या मुलीला आरोपी विजय उर्फ फक्कर पुंजाजी खोबरे याने बाजूला नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविचे कलम ३५४ अ व पोक्सो कायद्याचे कलम ११,१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गणोरकर यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध होण्याकरीता चार साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी विजय उर्फ फक्कर पुंजाजी खोबरे याला भादंविचे कलम ३४५ अ व पोक्सोचे कलम ११,१२ अंतर्गत दोषी ठरवून तीन वर्षाची सश्रम.

बातम्या आणखी आहेत...