आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षणाचा आधार:मृत खातेदाराच्या पत्नीला जिल्हा बँकेने दिला विमा संरक्षणाचा आधार; राशी व जीवन विमा संरक्षणाअंतर्गत बँकेद्वारा धनादेश

अकोट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार जि. प. शिक्षक गजानन विखे यांचा गेल्यावर्षी अपघाताने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात कर्ज राशी व जीवन विमा संरक्षणाअंतर्गत बँकेद्वारा त्यांच्या पत्नीला विमा रकमेचा धनादेश दिला.

तालुका सहकारी देखरेख संघाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब हिंगणकर यांच्या हस्ते स्वाती गजानन विखे यांना विमा राशीचा धनादेश दिला. यावेळी संचालिका भारतीताई गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य उपस्थित होते.जिल्हा बँक खातेदारांना व त्यांचे ठेवी व कर्जराशीला विम्याचे संरक्षण देण्यासाठी जिल्हा बँकेने धोरणात्मक निर्णय घेतला. त्या अंतर्गत विम्याचा प्रिमियम बँकेद्वारे भरले जाते.

अकोट शाखेत पगारदार खातेधारक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक गजानन सारंगधर विखे यांचा मृत्यू झाला. या योजने अंतर्गत पगारदार शिक्षकाच्या वारसाला जीवन विमा संरक्षणाचा आधार मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकने कार्यवाही करुन स्व. गजानन विखे यांच्या पत्नीला लाभ दिला

खातेदारांच्या हित संरक्षणासाठी बँक कटिबद्ध : हिंगणकर जिल्हा बँक ठेवीदार, कर्जदार, खातेदारांच्या हित संवर्धनासाठी कटीबद्ध आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने राज्यात उत्कृष्ट बँक म्हणून लौकिक प्राप्त केला. बँकेच्या कर्ज योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक नानासाहेब हिंगणकर यांनी केले. भारतीताई गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी कर्ज योजनांची माहिती दिली. सुमनबाई विखे, स्वाती विखे यांचा भारतीताई गावंडे यांनी सन्मान केला. स्वाती विखे व राजेंद्र वाकोडे यांनी बँकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दत्तात्रय तळोकार यांनी मनोगत व्यक्त केले.

संचालन रमाकांत मस्करे यांनी तर आभार शाखाधिकारी आशिष घोम यांनी मानले.या प्रसंगी अनिल सावरकर, नीलेश काळे, राजेश जाधव, संजय मालोकार, कर्मचारी संघटनेचे सरचिटणिस विवेक पाटील, रोषण पाटील, विनायक घनबहादूरकर, कमलेश लहाने, राज गुहे, नितीन म्हैसणे, सचिन देशमुख, सचिन खवले, नंदकिशोर गोटे, शंतनू हिंगणकर, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...