आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोच्च न्यायालय:ग्रा.पं.निवडणूक; उमेदवारी अर्जांची छाननी

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर दुसऱ्यांदा थेट सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यत्वासाठीच्या निवडणुकीअतंर्गत साेमवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. जिल्ह्यात सरपंचांच्या २६६ पदांसाठी तर सदस्यांच्या २ हजार ७४ जागांसाठी निवडणूक हाेत आहे. गत दाेन वर्षे काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी काही दिवस निर्बंध हाेते. तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने घेण्यात आल्या. त्यानंतर आता ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरम्यान साेमवारी ५ डिसेंबर राेजी उमेदवारी अर्जांची छाननी करून त्याची माहिती जाहीर केली.

अर्ज मागे ः उद्या अंतिम दिवस उमेदवारी अर्ज बुधवार ७ डिसेंबर ला दुपारी ३ पर्यंत मागे घेता येतील. मतदान रविवारी १८ डिसेंबरला, सकाळी ७.३० ते ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करता येईल. मतमोजणी मंगळवारी २० डिसेंबरला आहे.

बातम्या आणखी आहेत...