आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा नियोजन समितीवर (डिपीसी) जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीसाठी सर्व अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. सर्वच २८ अर्ज वैध ठरले असून, ८ आॅगस्टला यादी प्रसिद्ध हाेणार आहे. १८ ऑगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होेणार आहे.
जिल्हा परिषदेतून जिल्हा नियोजन समितीवर निवडून देण्यासाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यास शासनाने काही िदवसांपूर्वी परवानगी दिली हाेती. त्यामुळे सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासाकडून सुरू करण्यात आली आहे. प्रथम आता मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली . सदर यादीवर आक्षेप घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकही आक्षेप दाखल झालेला नव्हता. दरम्यान जिल्हा परिषदेतून जिल्हा नियोजन समितीवर निवडून जाणाऱ्यांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रमुख पक्षांनी भरले अर्ज : जिल्ह्यात १ ते ४ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. बुधवारी शिवसेना, कॉंग्रेस, अपक्ष, प्रहार व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गुरुवारी वंचितसह भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. एकूण अर्ज करणाऱ्यांची संख्या २८ झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.