आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रीडा व युवा सेवा संचालनालया अतंर्गत अकोला जिल्हा क्रीडा समिती, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शनिवारी 17 डिसेंबरला या स्पर्धेचे उद्घाटन झाले असून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील 210 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेत अमरावती विभागातील यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि अकोल्यातील 210 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. 14, 17 आणि 19 वयोगटातील स्पर्धकांच्या स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि सुनियोजितपणे संपन्न झाल्या. या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून प्रवीण ठाकरे (जळगाव), सोमदत्त तिवारी (जळगाव), निनाद सराफ (अमरावती), अविनाश जाधव (अमरावती), अमोल इंगळे (बुलडाणा), किरण पाटील (बुलडाणा), संतोष संघेवर(पुसद) तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलयाचे राजू उगवेकर यांनी काम पहिले.
यावेळी महानगर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष संदीप पुंडकर, क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे, सचिव जितेंद्र अग्रवाल, आतंरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे, प्रा. डॉ. सुहास उगले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविक संदीप पुंडकर यांनी केले तर संचालन प्रभातच्या सांस्कृतिक विभागाच्या संजीवनी अठराळे यांनी केले. क्रीडा कार्यालयाचे कर्मचारी, बुद्धीबळ संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह प्रभातच्या क्रीडा विभागाचे संतोष लोमटे, आशिष बेलोकार, राहुल वानखडे, विशाल कोथळकर, स्वप्नील मांदाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या यशासाठी प्रयत्न केले.
खेळातून सर्वांगीण विकास
खेळातून व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होत असून बुद्धिबळाच्या सरावातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांसह त्यांच्यातील निर्णय क्षमतांचा विकास होत असल्याचे मत मिझोराम राज्याचे फलोत्पादन विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. लहिंगमविया पचाऊ यांनी व्यक्त केले. उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.