आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’वरील दाखल गुन्ह्यांचा धिक्कार:माध्यमांवर गुन्हा म्हणजे एकप्रकारे दबावच, िवराेधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका 

अकाेलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासकीय प्रेसनोटच्या आधारे बातम्या कराव्यात काय? महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आैरंगाबाद जिल्ह्यात काेराेना विषाणूचे रुग्ण आिण मृत्यू वाढतच असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर  दै. दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करणे म्हणजे माध्यमांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे आहे, अशी टीका विराेधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत केली. जिल्ह्यात काेराेना िवषाणूचा कहर वाढतच असून या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी फडणवीस सोमवारी  जिल्हा दौऱ्यावर हाेते.  

सध्या महािवकास आघाडी सरकारच्या काळात राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्त्यांवर कारवाईचा सपाटाच सुरू करण्यात आला आहे. आता आैरंगाबाद जिल्ह्यात काेराेना विषाणूचे रुग्ण आिण मृत्यू वाढतच असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर  दै. दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही तर माध्यमांची मुस्कटबीच आहे, असे फडणवीस म्हणाले. पत्रकार परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे, आमदार गाेवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. डाॅ. रणजित पाटील आदींसह भाजपचे अनेक नेते उपस्थित हाेते. 

पत्रकारांनी िदले िनवेदन

आैरंगाबाद येथे  दै. दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने साेमवारी पत्रकार संघटना कृती समितीने िवराेधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना िनवेदन िदले. झालेली कारवाईची चुकीची असून हा मुद्दा लावून धरू, असेही ते म्हणाले. या निवेदनानुसार सरकारी यंत्रणेमध्ये जे काही सुरू आहे ते विविध दृष्टिकोनातून जनतेसमोर मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्यच आहे. सत्याच्या शोधार्थ विविध मुद्दे, माहिती, तपशील यांची उलटतपासणी करणे हे माध्यमांचे कामच आहे. ते सरकारी यंत्रणांना अप्रियही वाटेल. मात्र, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली माध्यमे ही लोकांना उत्तरदायी असल्याने ते आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडीत आहेत. सध्याच्या कोरोना संकटात माध्यमही फ्रंटवर येऊन कोरोना योद्ध्यांप्रमाणे लढत आहे. 

शासकीय प्रेसनोटच्या आधारे बातम्या कराव्यात काय? महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर : आैरंगाबाद येथे राज्यात सध्या काेरोनाचे सवाधिक रुग्ण आणि बळींची नोंद आहे. स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि समन्वयाअभावी अनागोंदी असून सुमारे २०६ जणांचे बळी गेले आहेत. या संदर्भात दैनिक “दिव्य मराठी’ने बेशिस्त यंत्रणेविरोधात आवाज उठवताच प्रकाशक, संपादक आणि पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या दडपशाहीचा निषेध करतानाच शासकीय प्रेसनोटच्या आधारे बातम्या कराव्यात काय ? असा सवाल  महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.  

औरंगाबाद शहर आणि जिल्हा गेल्या काही दिवसांत दररोज दोनशे रुग्णवाढीचा नकारात्मक वेग नोंदवत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत वास्तव जनतेसमोर आणून जनजागृती करण्याचे काम वृत्तपत्रे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’वर गुन्हा दाखल केला आहे. सत्य जगासमोर मांडण्याचा प्रसारमाध्यमांचा हक्क हिरावण्याचा हा अत्यंत बेजबाबदार प्रयत्न असल्याचे नमूद केले आहे.

दै. ‘दिव्य मराठी’च्या मुस्कटदाबीचा प्रयत्न

पोलिस तक्रारीच्या माध्यमातून दैनिक ‘दिव्य मराठी’ची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न हा संपूर्ण माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. निष्पक्ष पत्रकारिता करताना कुणाचीही भीती  न बाळगणे हे आमचे व्रत आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. कोरोनाशी लढ्यात प्रशासनाच्या निर्नायकी आणि लहरी धोरणाच्या परिणामाच्या वार्तांकनाची दखल उच्च न्यायालयानेही घेतली असून स्वत:हून याचिका दाखल करून घेतली आहे - प्रदीप मैत्र, अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ

उस्मानाबादेत घटनाकारांच्या चरणी पत्रकारांचे निवेदन

उस्मानाबाद - प्रशासनावर विश्वास उरला नाही, शासनाकडून चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी सुरू आहे. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत नाही. त्यामुळे घटनाकारांनीच आता पत्रकारांना न्याय द्यावा, अशी मागणी करीत औरंगाबादेतील ‘दिव्य मराठी’वरील गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी निवेदन अर्पण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाने सोमवारी उस्मानाबादेत अनोख्या पद्धतीने या विषयाकडे लक्ष वेधले. या वेळी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ‘दिव्य मराठी’चे ब्युरो चीफ चंद्रसेन देशमुख, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे, मार्गदर्शक राहुल कुलकर्णी, कमलाकर कुलकर्णी, राजा वैद्य, महेश पोतदार, सयाजी शेळके, देविदास पाठक यांच्यासह पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विदर्भात निषेध : अकाेल्यात पत्रकारांचे निवेदन

अकाेला | आैरंगाबाद जिल्ह्यात काेराेना विषाणूचे रुग्ण आणि मृत्यू वाढतच असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दै.दिव्य मराठीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे गुन्हे दाखल तात्काळ मागे घेण्यात यावेत आणि दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साेमवारी अकाेला जिल्हा पत्रकार संघटना कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली.निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लाेणकर व निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. खडसे यांनी स्वीकारले. यावेळी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ,अकाेला जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

बुलडाणा पत्रकार संघटना

बुुलडाण्यात मराठी पत्रकार संघ जिल्हा व तालुका स्तरावरील संघटना, महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा व तालुका, ग्रामीण पत्रकार संघ, प्रेस क्लब जिल्हा व तालुका, प्रेस काँसिल, महाराष्ट्र लढा पत्रकार संघटना, बहुजन पत्रकार संघ,इलेक्ट्रॉनिक मीडिया, साप्ताहिक पत्रकार संघटना यांनी निवेदने देत निषेध नाेंदवला.

अमरावतीमध्ये पत्रकार संघटनेकडून निषेध

अमरावतीत जिल्हाधिकाऱ्यांना अमरावती श्रमिक पत्रकार संघ तसेच पॉवर ऑफ मिडीयाकडून निवेदन देण्यात आले. याचवेळी वरूड येथे ‘पॉवर ऑफ मीडिया’, चांदूर बाजारला राज्य मराठी पत्रकार परिषद, मराठी पत्रकार संघ, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेकडून एकत्रितपणे तहसीलदारांना निवेदन दिले. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ बिग्रेड, भाजप, मनसेने पाठिंबा दिला.

यवतमाळ जिल्ह्यात पत्रकार संघटनांचा निषेध 

यवतमाळ जिल्ह्यात विविध संघटनांनी निषेध नोंदवला. सोबतच हे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्यात मारेगाव ग्रामीण पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा शाखा, पुसद तालुक्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटना, घाटंजी तालुका पत्रकार संघ, आर्णी प्रेस क्लबने निवेदन दिले.

नगर जिल्ह्यात राजकीय, सामाजिक संघटनांकडून निषेध 

नगर | अधिकाऱ्यांमधील असमन्वय अन् ‘इगो’मुळे औरंगाबादमध्ये हाताबाहेर जात असलेल्या कोरोना संक्रमणाच्या बाबतीत ‘दिव्य मराठी’ने विविध वृत्त प्रकाशित करून सत्य परिस्थिती समोर आणली. औरंगाबादेेत दोनशेहून अधिक जणांचा बळी कसा गेला हे दाखवणारे सत्य वार्तांकन केल्याच्या रागातून प्रशासनाने ‘दिव्य मराठी”वर गुन्हे नोंद केले आहेत. वस्तुस्थिती मांडणाऱ्या वृत्तपत्रांवर गुन्हे नोंद होत असतील तर ही लोकशाहीसाठी घातक बाब आहे, अशा शब्दात जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या पदाधकाऱ्यांनी सोमवारी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. निवासी उपजिल्हाधिकारी, तर तालुकास्तरावर तहसीलदारांना निवेदन देत औरंगाबाद प्रशासनाचा निषेध नाेंदवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...