आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीचा रूबरू उपक्रम:अकोल्यात पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद, नागरिकांनी मांडला समस्यांचा पाढा

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठीच्या 'रूबरू' उपक्रमाला रविवारी, 19 जूनला अकोल्यात मोठ्या थाटात सुरुवात झाली. शहरातील पहिला कार्यक्रम रिंगरोडवरील जानोरकर मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी प्रभाग 21 आणि प्रभाग 30 या भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रहिवाशांनी केशव नगर, खडकी, मलकापूर, कपिलवस्तू नगर, समता कॉलनी मलकापूर गावठाण आदी विविध भागातील समस्या, प्रश्न उपस्थितांपुढे मांडले.

महापालिकेच्या क्षेत्रातील रहिवाशी भागात अनेक नागरी प्रश्नांना नागरिक सातत्याने तोंड देतात. आपापल्या तऱ्हेने प्रश्न प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपुढे मांडतात. काही प्रश्न सुटतात तर अनेक रेंगाळत राहतात. अशा प्रश्नांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दिव्य मराठीच्या 'रूबरू' उपक्रमाला शहरात प्रारंभ झाला. पहिला कार्यक्रम जानोरकर मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी माजी महापौर सुमनताई गावंडे, माजी नगरसेवक विनोद मापारी, विजय इंगळे, शारदा ढोरे, मंगेश काळे, ठाणेदार श्रीरंग सनस यांच्यासह प्रभागातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

नाल्या, पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न

प्रभाग 21 आणि 30 मधील रस्त्याचे प्रश्न, पावसाळ्यात तुंबणारे पाणी परिणामी उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न, दिवाबत्ती आणि नाल्यांचे प्रश्न नागरिकांनी मांडले. काही समस्या मार्गी लागल्या असल्या तरी अनेक प्रश्न वर्षानुवर्षांपासून खितपत पडले आहेत. त्यावर जाब विचारत हे प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली. नागरिकांनी आपले प्रश्न लेखी स्वरूपात दिव्य मराठीला दिले आहेत.

नागरिकांच्या प्रश्नांना व्यासपीठ

या कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. रहिवाशी भागातील आपले नागरी प्रश्न मांडत. दिव्य मराठीने रुबरूच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...