आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगांचा सत्कार:दिव्यांग सोशल फाउंडेशन करणार दिव्यांगांचा सत्कार ; विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक सत्र २०२२ मध्ये ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्या सर्वांचा सत्कार दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलातर्फे केला जाणार असून गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. वर्ग दहावी व बारावीचा निकाल लागला. या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी अपंगत्वावर मात करून घवघवीत यश संपादन केले आहे. अशा सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी दि.२६ जून २०२२ पर्यंत दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या हेल्पलाइन ०९४२३६५००९० क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन अरविंद देव, प्रसाद झाडे, अनामिका देशपांडे, अंकुश काळमेघ, कीर्ती मिश्रा, स्वाती झुनझुनवाला, भारती शेंडे, सुशांत घुगे, पूजा गुंटीवार व सरोज तिडके यांनी केले आहे.स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलातर्फे प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम भारतभर राबवले जात आहेत, अशी माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...