आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तज्ज्ञांचा सल्ला:जिममधील कसरतीपूर्वी करा पुरेसे वॉर्मअप

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्याला सुरुवात झाली की तरुणाईचे जीममधील वर्कआऊट वाढते. अनेकजण नव्याने जिम सुरू करतात. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तासन््तास जिममध्ये घाम गाळताना काही काळजी घेणेही आवश्यक असते. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ सतर्क करतात.

नव्याने जिम जॉईन करणाऱ्यांकडून अनेकदा लहान-मोठ्या चुका होतात. पहिल्याच दिवसापासून जास्त वजन उचलणे, वॉर्मअप न करता वर्कआऊट सुरू करणे, इतरांचे अनुकरण करणे किंवा चुकीचा व्यायाम करणे आदी बाबींचा दुष्परिणाम किंवा जीममध्ये आपल्या चुकीने अपघात‎ होण्याची शक्यता असते. त्यामुळे‎ खबरदारीचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ‎ देतात. मधुमेह, उच्च रक्तदाब,‎ सांधीवात किंवा इतर काही आजार‎ असल्यास किंवा शस्त्रक्रिया‎ झालेली असल्यास वैद्यकीय‎ सल्ल्यानुसार जीममध्ये व्यायाम‎ करणे गरजेचे ठरते.‎ जीमला जाण्यापूर्वी टॉवेल, पाण्याची‎ बॉटल सोबत असावी.

जड अन्न‎ खाऊ नये. चुकीच्या व्यायामाने‎ स्नायू अतिरीक्त ताणून दुखापत‎ होण्याची शक्यता असते, त्यामुळे‎ प्रत्येकाने जीममधील तज्ज्ञ‎ प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसारच स्टेप‎ बाय स्टेप व्यायाम करावा.‎ जीममधील कसरतीनंतर सकस‎ आहार घेतल्यावर व्यायामाचा‎ परिणाम दिसून येईल. म्हणून‎ आहारविषयक आहार तज्ज्ञाचा‎ सल्ला घेता येईल.‎

याकडेही लक्ष द्या : जीमला‎ जाण्यापूर्वी झोप पूर्ण झालेली‎ असावी. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंतचे‎ जागरण टाळावे.‎ वर्कआऊट करताना प्रशिक्षकांच्या‎ सल्ल्याशिवाय इतरांची कॉपी करू‎ नका.‎ व्यायाम करताना सैल कपडे‎ परिधान करा.‎ वर्कआउट सेटमध्ये काही‎ सेकंदांचा तर प्रत्येक‎ व्यायामादरम्यान एक ते दोन‎ मिनीटांचा ब्रेक घ्या.‎ शरीराला अतिरिक्त ताण देऊन‎ तासन-तास व्यायामही धोक्याचा‎ ठरू शकतो.‎ या दरम्यान आपली प्रकृती,‎ वैद्यकीय सल्ला आणि‎ आहारविषयक सल्ला महत्त्वाचा‎ ठरतो.‎

वॉर्मअप विसरू नका
जिममध्ये मशीनने एक्सरसाइज करण्यापूर्वी प्रत्येकाने वॉर्मअप करावा. त्यामुळे जॉईंट रिलॅक्स होतात. लवचिकता प्राप्त होते. वॉर्मअपनंतर जिममध्ये वर्कआऊट केल्याने इतर दुखापती टळतील. झेपेल तेवढं वजन उचलूनच वर्कआऊट करावे. प्रारंभीच्या काळातच शरीरावर अतिरिक्त ताण देऊ नये.- डॉ. विशाल भागवत, अस्थिरोग तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...