आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलाशयात गणेश मूर्ती विसर्जन करू नका:मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन, जलप्रदुषण टाळा

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृद व जलसंधारण विभागाच्या जलाशयात गणेश मूर्तींचे विसर्जन न करण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी गत दाेन वर्षे जाहीर उत्सवावर प्रचंड मर्यादा हाेत्या. दाेन वर्षे जाहीर कार्यक्रमांच्या संख्यांवर मर्यादित हाेती. मात्र, यंदा निर्बंध हटल्याने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व अन्य उत् उत्साहाने सादर करण्यात येत आहेत. दरम्यान यंदाही गणेशाेत्सव माेठ्या उत्साहाने साजरा हाेणार असून, सरकारी यंत्रणांकडून विसर्जनाबाबतही खरबदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान मृद व जलसंधारण विभागाच्या जलाशयात व सिंचन तलाव, साठवण तलाव,पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हा पुरी बंधाऱ्यामध्ये गावातील तसेच शहरातील नागरीक गणेशमूर्ती विसर्जनासाठी येतात. गणेशमूर्ती विसर्जनात मूर्ती व निर्माल्यामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी जलाशयात तसेच सिंचन तलाव, साठवण तलाव,पाझर तलाव,गाव तलाव, कोल्हा पुरी बंधाऱ्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जन करू नये असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी केले आहे.

यासाठी टाळा

मृद व जलसंधारण विभागाच्या जलाशय व सिंचन तलाव, साठवण तलाव,पाझर तलाव,गाव तलाव, काेल्हापुरी बंधाऱ्यामधील पाणी शहरासाठी तसेच धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना पिण्यासाठी वापरण्यात येते. गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे व निर्माल्यामुळे जलप्रदूषण होते. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तसेच जलाशयातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने जीवितहानीच्या घटनादेखील घडतात.

जलाशयालगतच्या भागात वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषण होत असल्याच्या तक्रारीही ग्रांमपचायतींकडून होत आहेत.मृद व जलसंधारण विभागाचा धरणांचा परिसर हा अतिसंवेदनशील असल्याने सिंचन तलाव, साठवण तलाव,पाझर तलाव,गाव तलाव, कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेस बाधा निर्माण होऊ नये, याकरीता जलाशयामध्ये व धरणांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करू नये आणि पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागामार्फत जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...