आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मशीद, मंदरि आणि विहारासह गुरुद्वारांवरील भोंगे काढू नका; रिपाइंची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदरि, मशीद, विहार, गुरुद्वारांवरील भोंगे काढू नका, यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या गुडीपाडवा मेळाव्यात न्यायालयाने नरि्देशानुसार मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर १ मे महाराष्ट्र दनिी औरंगाबादला झालेल्या सभेत अकोल्यातूही मनसैनिक सहभागी झाले होते. आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पदाधिकारी,कार्यकर्त्यांची राज्यस्तर बैठक घेतली होती. त्यानंतर भोंगे हटवू नये, यासाठी रिपाइं आक्रमक झाली असून, मंगळवारी काढलेल्या. माेर्चात अनेक मागण्याही केल्या. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा गजानन कांबळे यांनी दिला. नविेदन देताना रिपाई बहुजन विद्यार्थी परिषदेचे विदर्भ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष रोहित वानखडे , युवराज भागवत , राजकुमार सरिसाट , मनोज गमे , अनिल पहुरकर , वैभव अशोक वानखडे , आकाश हवरिाळे ,वजिय सावंत ,स्वप्नील पालकर ,हरिा घुमरे ,विद्यानंद क्षीरसागर ,सूरज वाडकर ,संकेत कांबळे ,संतोष दाभाडे ,चेतन गायकवाड ,संदेश वाहूरवाघ ,संतोष नृपणारायन ,आशीष पालकर ,पवन कसबे ,कमलेश कांबळे , मिलिंद लबडे ,चेतन राठी ,सचनि गवई उपस्थित होते.

दरम्यान रिपाईतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मागण्यांचा समावेश केला. भूमिहनिांना ५ एकर जमीन द्यावी. मागासवर्गीयांचा बॅकलॉग भरावा. २०१९ पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना मान्यता द्यावी रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टी अधिकृत कराव्या. गरजूंना घरकुल द्यावे. शैक्षणिक पात्रता वाढवावी व शिक्षण मोफत करावे. उन्हाळी २०२२ ची परीक्षा ऑनलाइन घ्यावी. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू कराावे. मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात यावे.पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर ,खाद्यतेलचे दर कमी करून महागाई कमी होण्यासाठी प्रयत्न करवेत.

बातम्या आणखी आहेत...