आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:रुग्ण महिलेच्या विनयभंगप्रकरणी डॉक्टरला दोन वर्षांची शिक्षा

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओळखीतील रुग्ण महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टर आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल शुक्रवारी दिला.

डॉ. संजय भानुदास मोंढे (वय ४८ रा. तापडीया नगर मातृ तीर्थ अपार्टमेंटा) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टर संजय मोंढे हा जनरल फिजिशियन आहे. त्याची प्रॅक्टीस खेडोपाडी अधिक आहे. त्यानिमित्त तो गावागावांमध्ये जायचा. १२ ऑगस्ट २०१७ रोज तो बोरगाव येथे गेला असता पीडीत महिलेच्या घरी तो गेला आणि पाणी पिण्याच्या बहाण्याने तो महिलेच्या घरात घुसला.

यावेळी त्याने पीडित महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेने बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४,४५२ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कल्पना भराडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी सरकार पक्षाने पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. साक्षी पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोन वर्षांची शिक्षा व २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेश अकोटकर यांनी प्रभावीपणे सरकारची बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...