आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थान मधील दौसा येथील व्यवस्थेचा बळी ठरलेल्या निरपराध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. अर्चना शर्मा यांच्या कथित आत्महत्येच्या संदर्भात आयएमएच्या वतीने शनिवार ३ एप्रिल रोजी आयएमएचे महानगरातील संपूर्ण क्लिनिक व हॉस्पिटलची बाह्यरुग्ण सेवा सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुप कोठारी यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
स्थानिय आयएमए सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत वैद्यकीय वर्गावर सातत्याने होत असणारे हल्ले व त्यावर शासनाने काय उपाय करावे, केंद्रीय आयएम एची मागणी याची माहिती देण्यात आली. राजस्थान येथील डॉ. अर्चना शर्मा यांच्यावर हेतूपुरस्पर राजकीय पार्श्वभूमीतून आत्महत्या पर्यंतचे प्रकरण घडले. यामुळे संपूर्ण वैद्यकीय विश्व प्रभावित झाले असून वैद्यकीय वर्गा पुढे बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या संदर्भात त्वरित उपाययोजना करून अशा प्रकारचे आत्महत्या पर्यंतचे प्रकरण होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी आयएमएच्या वतीने करण्यात आली. या पत्रकार परिषदेत या वेळी डॉ. अर्चना शर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नूतन सचिव डॉ. भूपेश पराडकर, डॉ. एस. एस. काळे, डॉ. सत्यन मंत्री, डॉ. रणजीत देशमुख, आयएमएचे सचिव डॉ. तेजस वाघेला, डॉ. अमोल केळकर, डॉ. कमल लढढा, डॉ. कन्हैया अग्रवाल, डॉ. संतोष सोमानी, डॉ. संदीप चांडक, डॉ. राजेंद्र सोनोने, डॉ मनीष हर्षे, डॉ. मधुमती डहेनकार, डॉ. अनिता सोनोने, डॉ. सुनीता लड्डा, डॉ. वंदना सिंगी, डॉ. श्रद्धा सलामपुरिया, डॉ. अनिता सोमानी आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.