आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठ विशेष:खते विक्री करताना लिंक करू नका : एडीओ इंगळे; बियाणे योग्य दराने उपलब्ध करून द्या; कृषी व्यावसायिक संघाच्या बैठकीत केल्या सूचना

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बियाणे व खते विक्री करताना कोणतीही लिंक करून बियाणे/खते विकू नये. जादा दराने खते व बियाणे विक्री करू नये, अशी सूचना कृषी अधिकाऱ्यांनी कृषी व्यावसायिक संघाच्या बैठकीत दलिी. बैठकीत जलि्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयतर्फे कृषी व्यवसायिक संघाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर, मोहीम अधिकारी मलिंद जंजाळ, गुणनियंत्रण निरीक्षक नितीन लोखंडे तसेच तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी रोहिणी मोघाड, जलि्हा अध्यक्ष कृषी व्यावसायिक संघ मोहन सोनवणे उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर यांनी केले. आभार गणेश परळकर यांनी मानले.

कार्यक्रमासाठी मनीषा जोशी, कुमारी मीना चव्हाण, कृषी अधिकारी गजानन महल्ले, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत, व्ही. राखुंडे यांनी सहकार्य केले. काय म्हणाले कृषी अधिकारी? बोगस बीटी बियाणे व एचटीबीटी बियाणे तालुक्यांमध्ये विकले जाऊ नये असे कृषी अधिकारी म्हणाले. {सोयाबीन बियाण्याची विक्री करतांना उगवणक्षमता तपासूनच विक्री करावी. बियाणे व खते विक्री करताना कोणतीही लिंक करून बियाणे-खते विकू नये. जादा दराने खते व बियाणे विक्री करू नये. शेतकऱ्यांना बियाणे व खते योग्य दराने व योग्य पद्धतीने मिळतील याचे नियोजन करण्यात यावे. कृषी सेवा केंद्र धारकांनी सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवावे. कायद्यानुसार सर्व बाबींची पूर्तता करावी, असेही अधिकारी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...