आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिपीसी निवडणूक:53 पैकी 52 जणांनी केले मतदान; वंचित, महाविकास आघाडी व भाजपमध्ये लढत, उद्या निकाल

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा नियोजन समितीवर (डिपीसी) ग्रामीण मतदारसंघातून अर्थात जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडून देण्यासाठी साेमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण 53 पैकी 52 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकच जागा अविराेध झाली असून, उर्वरित 9 जागांसाठी एकूण 16 उमेदवार रिंगणात हाेते. यात सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे सहा, महाविकास आघाडीचे (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार व अपक्ष) नऊ व एका भाजपच्या उमेदाराचा समावेश हाेता. सदस्य संख्या लक्षात घेऊन वंचितने उमेदवार उभे केले हाेते.

जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषदेतून (ग्रामीण मतदारसंघ) निवडून देण्यासाठी 29 ऑगस्ट राेजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लाेकशाही सभागृहात मतदानाची प्रक्रिया पार पडली. सध्या 53 सदस्य संख्या असलेल्या जि.प.मध्ये वंचिते 25 आणि महािवकास आघाडीचे 23 व भाजपचे पाच सदस्य आहेत. महािवकास आघाडीतील शिवसेनेचे 12, काँग्रेस, राकाँचे प्रत्येकी चार, अपक्ष दाेन, प्रहार जनशक्ति पक्षाचा एक सदस्य आहे. साेमवारी एका अपक्ष सदस्य आजारीपणामुळे मतदान करून शकला नाही. उर्वरित सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला.

असा लागेल निकाल

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतील मतमाेजणी मंगळवारी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मतमोजणी करण्यात येईल. यानिवडणुकीचा निकाल एक तासात येण्याची शक्यता आहे.

धाकधूक वाढली

सर्वसाधारण प्रवर्गातून वंचितकडून रामकुमार गव्हाणकर व शंकरराव इंगळे आणि त्याविराेधात अपक्ष गजानन पुंडकर, शिवसेनेचे संजय अढाऊ व चंद्रशेखर चिंचाेळकर आणि भाजपचे प्रकाश अतकड िरंगणात हाेते. सर्वसाधरण महिला प्रवर्गातून वंचितकडून प्रमाेदिनी काेल्हे, मीना बावणे आणि त्याविराेधात शिवसेनेच्या गायत्री कांबे, अनुसूया राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या किरण अवताडे यांच्यात लढत झाली. अनुसूचित जाती प्रवर्गातून वंचितचे आकाश सिरसाट व शिवसेनेचे डाॅ. प्रशांत अढाऊ रिंगणात हाेते. अनुसूचित महिला प्रवर्गातून वंचितच्या नीता गवई आणि शिवसेनेच्या वर्षा वजिरे व राकाँच्या रंजगा िवल्हेकर यांच्यात सामना झाला.

..त्यामुळे लक्ष

मतदानानंतर आता निकालाकडे लक्ष लागले आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून वंचितचे महिला व पुरूष प्रत्येकी एक उमेदवार, अनुसूचित जाती प्रवर्गातून एक व अनुसूचित जाती प्रवर्गातून (महिला) सुद्धा एक सदस्य निवडून येण्याची शक्यता आहे. अर्थात सदस्य संख्या लक्षात घेता सत्ताधारी वंचितचे चार किंवा पाच सदस्य निवडून येऊ शकतात. सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपचे एक, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून राष्ट्रवादीच्या सदस्य तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून शिवसेनेच्या सदस्या आणि सर्वसाधारण प्रवर्गातून कॉंग्रेसचे सदस्य निवडून येण्याची शक्यता आहे. संपूर्ण चित्र 30 ऑगस्ट राेजी निकालानंतर स्पष्ट हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...