आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा नियोजन समिती:डीपीसी सदस्य निवडणुकीची अधिसूचना जारी

अकाेला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा नियोजन समितीवर (डिपीसी) जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीसाठीची अधिसूचना साेमवारी जाहीर केली. जि. प.चे १४ सदस्य निवडणुकीद्वारे डिपीसीवर जाणार आहेत. १ ऑगस्टला प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला. जिल्हा परिषदेतून जिल्हा नियोजन समितीवर निवडून देण्यासाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यास शासनाने काही दिवसांपूर्वी परवानगी दिली हाेती.

त्यामुळे सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासाकडून सुरू करण्यात आली आहे. प्रथम आता मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली . सदर यादीवर आक्षेप घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकही आक्षेप दाखल झालेला नव्हता. दरम्यान जिल्हा परिषदेतून जिल्हा नियोजन समितीवर निवडून जाणाऱ्यांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यापूर्वी मतदारी अंतिम झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...