आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डॉ. अजय उपाध्याय यांचे आवाहन, राष्ट्रीय सेवा योजना शिबिर‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाचं जीवन बहुमूल्य आहे.‎ जीवन म्हणजे बी टू डी बर्थ‎ जन्मापासून डी म्हणजे डेथ याच्या‎ मधात बीच आहे. सी म्हणजे चॉईसेस‎ ऑफ लाइफ. एकदा जीवन प्राप्त‎ झाल्यानंतर कोणाला माहीत, आता‎ पुढे केव्हा जन्म होणार? यासाठी‎ जीवनात पावलोपावली सावधान‎ राहणे जरुरी आहे. त्यामुळेच वाईट‎ चालिरीती आणि व्यसनमुक्तीसाठी‎ युवा शक्तींनी पुढे यावे, असे आवाहन‎ डॉ.अजय उपाध्याय यांनी केले.‎ औषधी निर्माण महाविद्यालय‎ कौलखेड अकोला द्वारे ग्राम लोणी‎ अकोला येथे आयोजित राष्ट्रीय सेवा‎ योजना शिबीरात ते बोलत होते.

ते पुढे‎ म्हणाले, वाईट लोकांच्या‎ संगतीत,अहंकारग्रस्त , आग्रहामुळे‎ व्यसन लागणे, वाईट सवय लागणे‎ त्याचे परिणाम व किंमत खूप मोजावी‎ लागते. प्राण सुध्दा संकटात येतात.‎ त्यामुळे आजच्या युवा पीढी ने हुंडा न‎ घेता विवाह संस्कारात गौरव समजावे.‎ स्वतः आदर्श विवाह करण्याचे‎ संकल्प घ्यावे वाईट चालीरीती,‎ व्यसनमुक्तीसाठी पुढाकार‎ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.‎ वैराग्यमूर्ती संत श्री गाडगे महाराज‎ प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा‎ प्रारंभ करण्यात आला. प्रा. शुभम‎ वरणकार, प्रा. श्रीकांत फुंडकर यांनी‎ प्रस्तावना मांडली. प्रा. मयुरी गावंडे,‎ मनीष भिसे, प्राचार्य नितिन भाजीपाले‎ आदी उपस्थित होते.‎