आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगण्यासाठी आणि शिक्षणासाठी वैयक्तिक संघर्ष करून दलितांच्या उत्थानापर्यंत तसेच स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंतचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास हा विविध क्षेत्रांसाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक क्षेत्राबरोबरच, आर्थिक, कृषी, शिक्षण, कायदा, पत्रकारिता, राजकारण, पर्यावरण, धर्म, संस्कृती, तत्वज्ञान, परराष्ट्र संबंध, व्यवस्थापन आदी विविध क्षेत्रांत डॉ. आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेची छाप सोडली. शोषित-वंचितांचा आधार बनलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जागतिकस्तरावर आजही विविध क्षेत्रांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहेत. डॉ. बाबासाहेबांकडून घेतलेल्या एकेका विचाराचे विविध क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांनी महत्त्व सांगितले.
कृषीविषयक विचार प्रेरणादायी डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज’ या पुस्तकातून त्यांच्या शेती विषयक विचारांची प्रगल्भता दिसते. शेतीसाठी विमा, जमिनीचा कस वाढवणे, कसदार बियाणे, उत्तम खते पुरवणे, यंत्रसामग्री देण्याबाबत सूचना त्यांनी सरकारला दिल्या. किफायतशीर उत्पादन समस्येकडे लक्ष वेधत सामुदायिक शेतीचा उपाय सुचवला. त्यामुळे त्यांचे कृषीविषयक विचार प्रेरणादायी आहेत. डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.
परिस्थितीविरोधात संघर्ष करणे शिकावे सामान्य कुटुंब, परिस्थितीतून समस्येवर मात करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगविख्यात झाले. त्यांच्या आयुष्यातून परिस्थितीविरुद्ध संघर्ष करणे हे शिकले पाहिजे. त्यांचे राष्ट्रनिर्मितीत अमुल्य योगदानआहे. काेणतीही संस्था, व्यवस्था किंवा समाज असो, त्यात नियमांचे पालन करणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे नियमांचे पालन करणे, करवून घेणे आणि नवीन नियम तयार करणे हेत्यांच्या विचारातून शिकण्यासारखे आहे. नीमा अरोरा, जिल्हाधिकारी, अकोला.
भेदभाव नष्ट करून अन्याय संपवावा विविध क्षेत्रांसह डाॅ. बाबासाहेबांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे वाटते. अन्याय , भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी उभारलेली चळवळ प्रेरणा देणारी आहे. समाजातील वंचित, शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणून अधिकार मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातही गरजू नागरिक किंवा कुणावर अन्याय होणार नाही, हा त्यांचा विचार आत्मसात करण्यासारखा आहे. डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.