आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:डॉ. प्रतिमा इंगोले यांना उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले यांना डॉ. गिरीश गांधी फाउंडेशन नागपूरचा उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. इंगोले यांच्या आतापर्यंत सहा कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यांच्या ‘बुढाईः जमिनीला आपोआप पडणारी भेग’ या पहिल्या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर पार्टटाइम या स्त्रीवादी कादंबरीस ना. सी. फडके पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘आत्मघाताचे दशक’ कादंबरीस पद्मश्री विखे पाटील पुरस्कार व अन्य चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘बोडखी’ या त्यांच्या चौथ्या कादंबरीस महाराष्ट्रातील विविध संस्थांचे चार पुरस्कार प्राप्त आहेत. तर पाचव्या ‘नक्षलग्रस्त’ कादंबरीला जनसाहित्य पुरस्कारासह ‘तुका म्हणे पुरस्कार’ व इतर पाच पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांची सहावी ‘राशाटेक’ कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. त्यांच्या साहित्यावर राज्यात २५ अभ्यासक संशोधन करीत आहेत. सातवी कादंबरी ‘बाणगंगेतिरी’ प्रकाशनाच्या वाटेवर असून ही पंचमहाभूतांपैकी जलतत्वावर आधारित आहे. डॉ. इंगोले यांना आतापर्यंत मिळालेल्या ११० पुरस्कारांपैकी सात शासनाचे पुरस्कार असून त्यातील एक सह्याद्री दूरचित्रवाणी वाहिनीचा आहे.

बातम्या आणखी आहेत...