आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Dr. Commencement Of Social Programs On The Occasion Of Babasaheb's Birth Anniversary; Organizing Activities Till 16th April |marathi News

महापुरुषांच्या विचारांचा जागर:डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यक्रमांची सुरुवात; 16 एप्रिलपर्यंत उपक्रमांचे आयोजन

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक न्याय विभागातर्फे यंदा अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येणार असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाला सुरूवात झाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. जयंतीनिमित्त ६ ते १६ एप्रिल या कालावधीत महात्मा जोतीबा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या विचारांचा जागर होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात झालेल्या परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. अनिता राठोड, समाज कल्याण अधिकारी डी.एम .पुंड आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. १६ एप्रिपर्यंत राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा डॉ. राठोड यांनी सांगितली. त्यानुसार सामाजिक समता कार्यक्रमाची सुरुवात ६ एप्रिलला झाली. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत आिण यात सर्वांनी सहभागी व्हावे ,असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले आहे.

असे होणार कार्यक्रम सामाजिक न्याय विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळांमध्ये ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा होणार आहे. स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात वितरण होईल. ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवणे तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. लघुनाट्य, पथनाट्य , महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार संविधान जागर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांना अभिवादन करून व्याख्याने, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...