आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस प्रशासन व जयंती मंडळांमध्ये होणार चर्चा‎:डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या‎ पार्श्वभूमीवर आज बैठकीचे आयोजन‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ जयंतीच्या पार्श्वभूमीवर जयंती मंडळे‎ आणि जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन‎ अशी संयुक्त बैठक १३ एप्रिल रोजी दुपारी‎ ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील‎ नियोजन भवन येथे आयोजित करण्यात‎ आली आहे. बैठकीला जिल्ह्यातील भीम‎ जयंती मंडळे, युवा मंडळे आणि युवकांनी‎ उपस्थित रहावे, असे आवाहन वंचित‎ बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव‎ राजेंद्र पातोडे केले आहे.‎

सार्वजनिक उत्सवादरम्यान एक‎ खिडकीतून आयोजन मंडळाच्या अर्ज‎ स्वीकार करून परवानगी दिली जाते. मात्र‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ जयंतीनिमित्त अशी कुठल्याही प्रकारची‎ व्यवस्था नसते.‎ जयंती साजरी करणारे मंडळे आणि‎ युवकांना पोलिस ठाण्यात परवानगीसाठी‎ अडवणूक केली जाते, असे ‘वंचित’च्या‎ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यंदाही‎ अकोट तालुका आणि जिल्ह्यातील इतर‎ भागात जयंती मंडळांना त्रास दिला जात‎ आहे.

गत वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी जयंती‎ मंडळ आणि जिल्हा प्रशासन व पोलिस‎ प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित केली‎ होती.‎ यंदाही अशी बैठक व्हावी, अशी मागणी‎ वंचित बहुजन युवा आघाडीने केली हाेती.‎ त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संजय‎ खडसे यांनी बैठकीबाबत सूचित केल्याचे‎ ‘वंचित’चे म्हणणे आहे.‎