आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यता:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पीक वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथील केंद्रीय पिकवाण प्रसारण उपसमितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तीन पीक वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली. यामध्ये तूर पिकाचे पीडीकेव्ही आश्लेषा वाण, ज्वारी पिकाचे रब्बी हुरडा वाण ट्रॉम्बे अकोला सुरुची आणि तांदळाचा पीडीकेव्ही साधना आदी वाणांचा समावेश आहे.

तूर पिकाचा पीडीकेव्ही आश्लेषा हा मध्यम कालावधीत परिपक्व होणारा (१७४ ते १७८ दिवस), मर वांझ, फायटोप्थेरा, करपा, मॅकोफोमिना करपा व पानांवरील सर्कोसपोरा ठिपके या रोगांना मध्यम प्रतिकारक्षम वाण असून २० % प्रथिने आणि ७४ % डाळीच्या उताऱ्यासह अधिक उत्पादन देणारा वाण आहे. याचे सरासरी १९ ते २० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन होते.

एक गाव-एक पीक : शाश्वत शेतीसाठी ठरणार वरदान
ज्वारीसह कडधान्य व तेलबिया पिकाखालील क्षेत्र वाढीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत असून नुकतेच राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त पीक वाण शाश्वत शेतीसाठी परिणामकारक ठरणार आहेत. येत्या काळात एक गाव- एक पीक वाण संकल्पना राबवत उपरोक्त पीक वाणांचे प्रात्यक्षिके गावोगावी राबवण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.- डॉ. शरद गडाख, कुलगुरू

बातम्या आणखी आहेत...