आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला एक देश दोन संविधान दोन निशान नही चलेगा यासाठी प्राणाची आहुती देणारे जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दूरदृष्टी ठेवून समाजहिताचे कार्य केले, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी केले. भाजप कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल होते. ते पुढे म्हणाले, डॉ. मुखर्जी यांनी राष्ट्रासाठी पदत्याग करून सत्ता सोडून राष्ट्र भक्तांची फौज निर्माण केली.
सत्तेपेक्षा राष्ट्र महत्वाचे, अशी शिकवण त्यांनी दिली. ३७० कलमांसाठी मंत्री पदाचा त्याग केला. त्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करणे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांचे तसेच नागरिकांचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले, भाजप महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी माधव मानकर जयंत मसने, रामप्रकाश मिश्रा, संजय गोडफोडे, संजय गोडा, चंदा शर्मा, गिरीश जोशी, संतोष पांडे, शीतल जैन, उमेश गुजर, राजेंद्र गिरी, सुमन गावंडे, धनंजय धबाले, सुनील भाटे, रवी जैन, चंदा ठाकूर, शीतल रुपारेल, सुजित ठाकूर, मिलिंद राऊत, अनिल नावकार, प्रशांत अवचार, मनोज साहू, राजेश चौधरी, अनिता चौधरी, रमेश करियार, नितीन राऊत, शकुंतला जाधव, साधना येवले, सतीश येवले, नीलेश निनोरे, तुषार भिरड, पप्पू वानखडे, सोमेश्वर पानखडे, रामेश्वर वानखडे, रंजीत खेडकर, संजय झाडोकार, सागर शेगोकार, विनोद मनवाणी, हरिभाऊ काळे, आनंद बलोदे, रवींद्र भंसाली, दिलीप मिश्रा, जस्मीत ओबेराय, अमोल गोगे आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बार्शीटाकळीत भाजपतर्फे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन
बार्शीटाकळी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गुरुवार, २३ जूनला आ. हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात भाजपचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ग्रामीण उद्योजक उपाध्यक्ष गोपाल वाटमारे यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या वेळी संजय इंगळे, वैभव पाठे, संजय इंगळे, मनोहर बोबडे, युवा ता. अध्यक्ष योगेश कोंदनकार, उपाध्यक्ष विलास गोरले, पं. स. उपसभापती संगीता जाधव, सुनील थोरात, गजानन लुले, अक्षय शेळके, गणेश झळके, प्रमोद भाकरे, रायसिंग राठोड, रमेश वाटमारे, विनोद राठोड, विठ्ठल वाघ आदी उपस्थित होते, असे भाजपच्या वतीने कळवण्यात आले
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.