आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेची अर्थ समिती आक्रमक:पाणीपट्टीची वसुली थकली; अधिकाऱ्यांचेही वेतन राेखणार

अकाेला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेअतंर्गत थकलेल्या पाणीपट्टीचा िवषय िजल्हा परिषदेच्या अर्थ समितीच्या सभेत गाजला. पाणी पट्टी अपेक्षेनुसार वसूल न झाल्यास अधिकाऱ्यांचेही वेतन राेखण्यात येईल,’ असा इशारा सदस्यांनी दिला. वसुलीची टक्केवारी १० टक्केच असल्याचे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.जिल्ह्यात ८४ आणि ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा यासारख्या प्रमुख याेजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येताे. मात्र पाणी पट्टी माेठ्याप्रमाणात थकली आहे.

पाणी सर्वांपर्यंत न पाेहाेचणे, देखभाल, वसुलीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसणे आदींमुळे पाणी पट्टी वसुली हाेत नाही. परिणामी अनेकदा पाणी पुरवठा खंडीत हाेताे. त्यामुळे िज.प.ला स्वउत्पन्नातून देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करावा लागताे. दरम्यान अर्थ समितीच्या सभेत पाणी पट्टी वसुलीसह विविध विभागाच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.

सभेत केवळ चर्चाच
४० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या ग्रामपंचायतींचे सचिव, सरपंच यांच्यावर संयुक्तपणे जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय यापूर्वी झालेल्या िजल्हा परिषदेच्या एका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला हाेता. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या हाेता. ९० पेक्षा जास्त सरपंच-सचिवांवर जबाबदारी निश्चित हाेण्याची शक्यता हाेती. मात्र त्यानंतर ही कारवाई थंड बस्त्यात पडली.

बातम्या आणखी आहेत...