आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:डोळ्यात ड्रॉप टाकून वृद्ध‎ महिलेचे दागिने पळवले‎

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोपचार रुग्णालयात‎ डोळे तपासणीसाठी गेलेल्या ६५ वर्षीय‎ वृद्ध महिलेला एक भामटा मनपातून‎ प्रत्येकी ४० हजार रुपये मिळतात अशी‎ बतावणी करून मनपात घेऊन गेला.‎ तेथे महिलेच्या डोळ्यात ड्रॉप टाकला.‎ तिने डोळे बंद केले असता‎ तिच्याकडील ४० हजारांचे दागिने‎ घेऊन तो पळाला. ही घटना बुधवारी‎ घडली. या प्रकरणी सिटी कोतवाली‎ पोलिसांत गुन्हा दाखल केला.‎

जुने शहरातील सोनटक्के प्लॉट‎ येथील रहिवासी शाहिनाबी फिरोजाबी‎ व पती हे दोघे डोळे तपासण्यासाठी‎ सर्वोपचार रुग्णालयात गेले होते.‎ मनपातून प्रत्येकी ४० हजार असे‎ तुम्हाला ८० हजार रुपये मिळतात,‎ असे म्हणून दोघांनाही मनपाच्या‎ आवारात घेऊन आला. त्यानंतर त्याने‎ महिलेच्या डोळ्यात ड्रॉप टाकला व‎ त्यानंतर महिलेचे दागिने घेऊन तो‎ पसार झाला.‎

बातम्या आणखी आहेत...