आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा हल्ला:अकोल्यात भर रस्त्यावर पत्नीने पतीवर केले कात्रीने वार; म्हणाली- हा रोज दारु पिऊन मारहाण करतो, म्हणून मी रस्त्यावर आणून मारले

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारु पिऊन रोज घरी येणे आणि पत्नीला मारहाण करणे, पतीला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे वैतागलेल्या पत्नीने तिच्या पतीवर कात्रीने जीवघेणा हल्ला केला आहे. रस्त्याच्या मध्यभागी या पती-पत्नीमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अकोला शहरातील ही घटना आहे.

पत्नीने हल्ला करुन पतीला जखमी केले आहे. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. लोकांनी संतापलेल्या महिलेला पतीजवळून दूर केले. तरीही महिला पतीवर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न करत होती.

लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातून घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांना पकडून पोलीस ठाण्यात नेले, जखमी पतीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच त्या दोघांचे कुटुंबिय माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात आले. दोघांमध्ये समझोता केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना त्यांच्यासोबत घरी नेले.

बातम्या आणखी आहेत...