आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाण्याचा वापर योग्य व काटकसरीने करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. वातावरण बदल व अनिश्चित पर्जन्यमानामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक असून, पाण्याच्या पुर्नवापराबाबत प्रशासन, सामाजिक व शैक्षणिक संस्थानी शालेय विद्यार्थ्यांसह जनसामान्यापर्यंत जनजागृती करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी बुधवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जलजागृती सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला नविासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोला सिंचन मडळाचे अधिक्षक अभियंता सु.गो.राठी, अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.खु.वसुलकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. चव्हाण, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, अकोला सिंचन मंडळचे उपअधिक्षक अभियंता शिल्पा आळसी, काटेपूर्णा पाणी वापर संस्थाचे अध्यक्ष दिगांबर गावंडे, प्रकल्पस्तरीयपाणी वापर संस्थाचे अध्यक्ष मनोज तायडे, केशवराज पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षा मुमताज देशमुख आदी उपस्थित होत्या.
पाण्याचा पुनर्वापर करा : पाण्याचा वापर योग्य व काटकसरीने होणे आवश्यक असून, यांची सुरुवात शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करावी. यासाठी शाळा व महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धेच्या माध्यमातून पाण्याचे महत्व रुजवावे.पाण्याचा अपव्यय न करता पाण्याचा जास्तीत जास्त पुर्नवापर करावा. यासाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबवावे. जलजागृती सप्ताह मर्यादित कालावधीतपुरता न राबविता संपूर्ण वर्षभर ही मोहिम राबवावी. तसेच आगामी काळातील टंचाई लक्षात घेवून सर्व शासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
सप्ताहभर कार्यक्रम : जलजागृती सप्ताहमध्ये ग्रामीण भागात जल जागृती व्हावी याकरीता कार्यक्रम राबविण्यात येणार असून शासनाच्या योजनाची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. कार्यक्रमाची प्रास्ताविक अकोला सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता सु.गो. राठी यांनी तर आभार प्रदर्शन सौ आळशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अश्विनी देशमुख यांनी केले.
जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जलजागृती : पाटबंधारे विभागाच्यावतीने जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये पाण्याचे महत्व व वापर याबाबत माहिती व्हावी याकरीता शहरी व ग्रामीण भागाच्या महत्वाच्या ठिकाणी चित्ररथाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाला १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हिरवी झेंडीदाखवून रवाना केले.
जलाद्वारे कलश पूजन : जलजागृती सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात मोर्णा या नद्यांच्या जलाद्वारे कलश पूजन करण्यात आले. जिल्ह्यातील काटेपूर्णा, पूर्णा, वान, निर्गुणा, उमा व मोर्णा या नद्यांच्या जलाद्वारे कलश पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी जलप्रतजि्ञेचे वाचन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.