आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन दिवसांचा अल्टीमेटम:पीक विमा याेजनेत तुटपुंज्या मदतीमुळे शेतकरी संघटनेची गावात रात्री जनजागृती

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पीक विमा याेजनेअंतर्गत तुटपुंजी मदत िमळत असल्याने शेतकरी संघटनेकडून गावांमध्ये रात्रीपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे. या माेहीमेअंतर्गत कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधी व शेतकऱ्यांची बैठकही झाली. आता येणाऱ्या दाेन िदवसांत हा प्रश्न िनकाली न िनघाल्यास थेट कंपनीच्या अकाेल्यातील कार्यालयात शेतकऱ्यांनासाेबत घेऊन धडक देण्यात येईल, असा इशारा संघटनेनने साेमवारी दिला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटले. पीक विमा याेजनेच्या माध्यमातून तरी नुकसान भरपाई िमळावी, अशी अपेक्षा असते. यासाठी शेतकरी आिण केंद्र- राज्य सरकार हा िहस्सा भरून पीक विमा काढण्यात येताे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेसा माेबदला िमळत नाही. यंदा तर खरीपसह रब्बी हंगामातही प्रचंड पाऊस झाला. संततधार व अतिृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचले व पिके सडली. शेतकऱ्यांनी पीक विमा याेजनेअंतर्गत विमाही उतरवला हाेता. मात्र माेबदला पुरेसा व वेळेवर िमळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, शेतकरी संघटनेने जनजागृतीसाठी अनाेखी माेहीम सुरू केली आहे.

अशी राबवली जाते माेहीम ः पीक विम्याबाबत शेतकरी संघटने तेल्हारा तालुक्यातील अडगाव परिसरात माेहीम राबवली. या माेहीमेेत शेतकऱ्यांसह जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काैटकर, दिनेश देऊळकार, माेहन खिराेळकार, अमाेल मसूरकार, रवींद्र भाेपळे, रवींद्र निमकर्डे, नीलेष नेमाळे, दिनेश गिऱ्हे, मकसूद मुल्लाजी, जाफर खान, रामकिशाेर थुटे, विलास इंगळे, मंगेश रेडे आदी सहभागी झाले. माेहिमेत शेतकऱ्यांकडे जावून संवाद साधण्यात येताे. शेतकऱ्याने िकती रुपयांचा विमा काढला, पंचानाम्यात िकती टक्के क्षेत्रावर नुकसान दाखवण्यात आले.

अशी आहे माहिती २०२२-२३ मध्ये पीक विमा याेजनेअंतर्गत ३ लाख २० हजार ९४१ शेतकऱ्यांनी २४ काेटी २१ काेटी ५५ लाख आिण केंद्र राज्य सरकारने आपला प्रत्येकी िहस्सा ५५ काेटी भरला. यातून २ लाख ६५ हजार १२१ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. पीक विम्याच्या ८५ हजार दाव्यांपैकी ७१ हजार २९० दावे िनकाली निघाले आहेत. यातून आतापर्यंत ४० काेटी ९६ लाख रुपये माेबदला वितरीत करण्यात आला आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत माहिती सादर केली.

बातम्या आणखी आहेत...