आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची बातमी:'स्कॉडा' कार्यप्रणालीचे काम न झाल्याने शहरातील 3 जलकुंभाना शुक्रवारऐवजी शनिवारी मिळणार पाणी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत योजने अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या तीन जलकुंभावर स्कॉडा अॅटोमेशन कार्यप्रणालीचे काम पूर्ण न झाल्याने या तिनही जलकुंभावरुन ज्या भागाला पाणी पुरवठा होतो, त्या भागाला आता शुक्रवार ऐवजी शनिवारी पाणी पुरवठा केला जाणार आहे. यामुळे हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा सबलीकरणाची विविध कामे सुरु आहेत. यापैकी काही पूर्ण झाली आहेत. पाणी पुरवठा योजनेचे जाळे मोठे असल्याने मॅन्युअली सर्व कामे करणे अवघड होत आहे. तसेच योजनेवरील तांत्रिक कर्मचारी दर महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळेच कमी मनुष्यबळाचा वापर करुन पाणी पुरवठा योजनांमधील होणाऱ्या प्रक्रियेमध्ये स्वयंचलन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. स्कॉडा अॅटोमेशन पद्धतीमुळे पाण्याची गुणवत्ता व संयंत्रणाचे विविध प्रमाणके ऑनलाईन पाहता येणार आहे. व आवश्यकतेप्रमाणे कंट्रोल करता येणार आहे.

शहरातील 21 जलकुंभावर ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. आता पर्यंत केवळ तीन जलकुंभावर हे काम झाले असून आता लोकमान्य नगर, गंगा नगर आणि जोगळेकर प्लॉट या तीन जलकुंभावर कार्यप्रणाली बसवण्याचे काम सुरु करण्यात आले. हे काम दोन दिवसात पूर्ण होईल, अशी खात्री पाणी पुरवठा विभागाला होती. त्यामुळे या तीन जलकुंभावरुन ज्या भागाला पाणी पुरवठा होतो. त्या भागाला 1 व 2 जुन रोजी पाणी पुरवठा होणार नाही, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली. मात्र स्कॉडा अॅटोमेशनचे काम 2 जुन रोजी पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आणखी एक दिवस या तीन जलकुंभाचा पाणी पुरवठा ठप्प राहणार आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना होणाऱ्या त्रासा बद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

या भागाचा पाणी पुरवठा ठप्प

लोकमान्य नगर भागातील जलकुंभावरील शिवसेना वसाहत, तथागत नगर, साई नगर, अनंत नगर, गुरुदेव नगर, गंगा नगर जलकुंभावरील गिता नगर, राहत नगर, पोलिस वसाहत, आकोली, स्नेह नगर, जोगळेकर प्लॉट भागातील जलकुंभावरील साई नगर, फडके नगर, सावजी स्कुल परिसर या भागाला आता ४ जुन रोजी पाणी पुरवठा केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...