आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

642 वीज ग्राहकांच्या नावात बदल:सेवा पंधरवड्यात महावितरणने दिल्या जिल्हाभरात 1,897 विद्युत जोडण्या

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाअंतर्गत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा या उपक्रमात जिल्ह्यात नवीन १ हजार ८९७ घरगुती िवद्युत जाेडण्या देण्यात आल्या. यात अकाेला परिमंडळातील अकाेला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील ६ हजार १७७ घरगुती ग्राहकांचा समावेश आहे. तसेच ग्राहकांच्या मागणी अर्जानुसार ६४२ वीज ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आला आहे.

नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी राज्य शासनाकडून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या सेवा पंधरवाड्यात विविध विभागातील १४ सेवांबाबत असलेल्या प्रलंबित अर्जाचा जलदगतीने निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.या सेवा मध्ये प्रलंबित घरगुती वीज जोडणी आणि मालमत्ता हस्तांतराणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव जोडणे या सेवा देण्यात आल्या आहे.

नवीन जाेडणीचे काेटेशन
अकाेला परिमंडळातील ४०६ ग्राहकांच्या वीज जोडणीच्या नवीन अर्जावर कार्यवाही करत त्यांना पैसे भरण्याबाबत कोटेशन देण्यात आलेले आहेत. या ग्राहकांनी पैसे भरल्यानंतर त्यांना वीज जोडणी देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...