आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खा. राऊत, देशमुखांवर रेल्वे पोलिसांमध्ये गुन्हा:गद्दार’ म्हटल्याची खा. भावना गवळींची तक्रार

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार नितीन देशमुख आणि इतरांवर बुधवारी रात्री लोहमार्ग पोलिसांत भादंविचे कलम २९४, १४३, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे काल माझ्याविरुद्ध अकोला रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी झाली, असा आरोप खासदार भावना गवळींनी केला.

गुरुवारी सकाळी आमदार देशमुख आपली भूमिका मांडणार आहेत. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत रेल्वे स्थानकावर आमने-सामने आले होते. विदर्भ एक्स्प्रेसने काल रात्री अकोला रेल्वे स्थानकावरून दोन्ही खासदार मुंबईकडे जात होते. या वेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भावना गवळी यांना पाहून ‘गद्दार गद्दार’ अशी घोषणाबाजी झाली होती. तसेच रेल्वेत बसलेल्या खासदार भावना गवळी यांच्यासमोर ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणाही दिल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...