आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओढ गणरायाची!:500 चिमुकल्यांनी बनवला इको फ्रेंडली गणपती बाप्पा; गणपती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लागड्या बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक राहीले आहे. सध्या पर्यावरणपूरक गणेशाला मागणी आहे. याच उद्देशातून अकोल्यामध्ये रविवारी भव्य शाडू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा अयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत 500 वर चिमुकल्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सहभाग घेत मातीच्या सुबक, सुंदर गणेश मूर्तिंना आकार दिला.

कार्यशाळेतील मूर्ती घरी बसवणार

पर्यावरण रक्षणात आपलाही हात लागावा म्हणून ही कार्यशाळा आयोजित केली गेली. अत्यंत उत्साही वातावरणात अगदी 4 वर्षाच्या मुलांपासून चिमुकले कार्यशाळेत सहभागी झाले. मुलांचा उत्साह बघता पालकही गणपती बनवायला बसले. कार्यशाळेत 500 हून अधिक शाडू मातीचे गणपती तयार करण्यात आले. आपल्या घरी हीच सुंदर मूर्ती यंदा बसविण्याचा संकल्प यावेळी सहभागींनी घेतला.

पर्यावरणपूरक उत्सवाचा संकल्प

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्ती विसर्जनानंतरही कित्येक दिवस पाण्यात विघटित होत नाहीत. त्यामुळे त्यांची विटंबनाही होते. रासायनिक रंगामुळे नद्या, तलाव, विहिरीमधील पाणी प्रदूषित होते. याला रोखण्यासाठीच प्लास्टर ऑफ पॅरीसच्याऐवजी शाडूच्या मातीचा जास्तीत वापर होणे गरजेचे आहे. त्यामुळे घरोघरी शाडू मातीपासून तयार झालेले गणपती स्थापन होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे तसेच संस्कृतीचे रक्षण होईल, असा संदेश कार्यशाळेतून देण्यात आला.

यांनी केले मार्गदर्शन

संत गाडगेमहाराज सेवा समितीच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सहभागींना माती आणि इतर साहित्य पुरवण्यात आले. सकाळी 11 वाजता कार्यशाळा सुरू झाली. यावेळी अकोल्यातील प्रसिद्ध मूर्तिकार शरद कोकाटे यांनी मुलांना गणपती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी समितीचे निशिकांत बडगे, विनोद मापारी, कल्पना रावत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यशाळेच्या आयोजनात अकोल्यातील पर्यावरणप्रेमींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी शहरातीन अनेक मान्यवरांपी कार्यशाळेला भेटी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...