आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवस्मारक समिती:इको-फ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धा ; तीन रोख, पाच प्रोत्साहनपर बक्षिस

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरक्षण मार्गावरील सहकार नगर भागातील शिवस्मारक समितीच्या वतीने ईको-फ्रेंडली घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत गणेश भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.दोन वर्षाच्या कालावधी नंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे गणेश भक्त, गणेश मंडळाच्या उत्साहाला उधाण आले आहे. त्यामुळेच यावर्षी मोठ्या थाटामाटात केवळ सावर्जनिकच नव्हे तर घरगुती गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. गणराया हा सर्वाचा लाडका बाप्पा आहे. त्यामुळेच गणपती उत्सवात केवळ सावर्जनिक मंडळेच सजावट करीत नाहीत. तर बालगोपाळ आपपाल्या घरी गणपतीची स्थापना करताना मोठ्या प्रमाणात सजावट करतात. ही बाब लक्षात घेवूनच शिव स्मारक समितीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकास तीन हजार एक रुपये, द्वितीय क्रमाकांस दोन हजार एक रुपये तर तृतिय क्रमांकास १००१ रुपयाचे रोख बक्षिस दिले जाणार आहे. याच बरोबर पाच प्रोत्साहन बक्षिसे दिले जाणार असून प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेत आपल्या घरी गणपतीची सजावट करणाऱ्या जास्तीत जास्त गणेश भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवस्मारक समितीने केले आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीच्या वतीने कळवण्यात आली आहे.

असे होता येईल सहभागी
आपल्या घरी ईको-फ्रेंडली घरगुती गणपतीची सजावट केल्या नंतर सजावटीचे आणि गणेश मुर्तीचे प्रत्येकी दोन फोटो व एक मिनिटाचा व्हिडीओ तयार करावा. हे फोटो आणि व्हिडीओ बुधवार ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजे पर्यंत प्रा.डॉ.ज्ञानसागर भोकरे (मो.९८२२७००४१९), आशिष चौथे (मो.९८८१५८१८३७), तुषार जायले (मो.७५०७००८००१), संजय शिरेकर (मो.९०२८१२०४००) यापैकी कोणत्याही एका मोबाईल क्रमाकांवर व्हॉट्सअॅपवर पाठवावा. आलेल्या स्पर्धकांमधुन विजेते स्पर्धक निवडले जातील. बक्षिस वितरणाचा कार्यक्रम गुरुवार ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सहकार नगरातील शिवस्मारक परिसरात होईल. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

बातम्या आणखी आहेत...