आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस प्रवक्त्यांचा भाजपवर आरोप:मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरून लक्ष विचलित करण्यासाठी गांधी कुटुंबाला ईडीची नोटीस दिली

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरून लक्ष विचलित करण्यासाठी गांधी कुटुंबियांना ईडीची नोटीस पाठवली आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला. ते अकोल्यात बोलत होते.

डॉ. ढोणे म्हणाले, महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, रुपयांची घसरण, अर्थव्यवस्थेची घसरण, वाढती बेरोजगारी, काश्मिरी पंडितांची हत्या व पलायन यामुळे देशात मोदी सरकारविरोधात तयार झालेल्या असंतोषावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी व श्रीलंकेतील 500 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट गौतम अदाणी यांना देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे यांच्याकडे आग्रह धरल्याचा आरोप वीज मंडळाच्या अध्यक्षानी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारची झालेली बदनामी लपविण्यासाठी जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपवर डागले टीकास्त्र

डॉ. सुधीर ढोणे म्हणाले की, ' कोणत्याही राजकीय पक्षाने दिलेले कर्ज हे अपराधही नाही व बेकायदेशीरही नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने 6 नोव्हेंबर 2012 रोजीच्या पत्रानुसार दिला आहे. कंपनीच्या संचालकांना आर्थिक लाभ नसल्याने गैरव्यवहाराचा आरोप हास्यास्पद आहे.

भाजपमध्येच दुमत

डॉ. सुधीर ढोणे ​​​​म्हणाले, 'नॅशनल हेराल्ड' हे वृत्तपत्र उत्पनाच्या अभावामुळे या कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नसल्याने हे वृत्तपत्र चालविणा-या 'असोशिएटेड जर्नल्स लिमिटेड' या कंपनीने 'यंग इंडिया' या कंपनीला दिले. 'यंग इंडिया' ही कंपनी 'नॉट फॉर प्रॉफिट' म्हणजेच नफा न कमविणारी कंपनी आहे. त्यामुळे या कंपनीचे प्रबंध संचालक असलेल्या सोनिया गांधी, राहुल गांधी, ऑस्कर फर्नांडीस, मोतीलाल व्होरा, सुमन दुबे या संचालकांना कोणताही नफा, पगार, लाभांश, आर्थिक फायदा मिळत नाही व हे सदस्य 'यंग इंडिया'चे शेअर्स विकुही शकत नाहीत. याचाच अर्थ 'यंग इंडिया' या कंपनीतून संचालकांना एक पैशाचा आर्थिक लाभही मिळू शकत नाही. असे असतांनाही मोदी सरकार जाणीवपूर्वक राजकीय द्वेष भावनेतून या प्रकरणात खोट्या आरोपात सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

खोटे बोलणे सुरू

डॉ. सुधीर ढोणे ​​​​म्हणाले, 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरणात भाजपाचे केंद्रातील नेते 5 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा तर राज्यातील भाजपाचे नेते 2 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आहेत. भाजपाच्या नेत्यांजवळ भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा नसल्याने ते कपोलकल्पीत आकडे जाहीर करीत असल्याचे जनतेला दिसून येत आहे. 'खोटे बोल पण रेटून बोल' ही भाजपाची नेहमीचीच पध्दत असल्याने जनताही आता भाजपच्या आरोपांना गंभीरतेने घेत नसल्याचा दावा त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...