आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराधार मुलांची शैक्षणिक वाट हाेणार प्रकाशमय:जागर फाऊंडेशन निराधारांची दिवाळी करणार आनंदी, रद्दी संकलनाला सुरुवात

अकोला8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीत निराधारांची शैक्षणिक वाट प्रकाशमय हाेण्यासाठी सालाबाद प्रमाणे यंदाही जागर फाऊंडेशनने निरांधारांची दिवाळी उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. गरीबांच्या झोपडीत शिक्षणाचा दिवा पेटावा, यासाठी रद्दी संकलनातून एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा संकल्प फाऊंडेशनने केला.

दिवाळीत घराची साफसफाई करताना रद्दीसह अन्य टाकाऊ सािहत्य विकण्यात येते. दरवर्षी जागर फाऊंडेशनकडून नागरिकांना ही रद्दी न विकता त्यांना देण्याचे आवाहन केले जाते. ही रद्दी फाऊंडेशनकडून संकलित केली जाते. या उपक्रमात राज्यभरातून सामाजिक दातृत्त्वाच्या भावनेतून नागरिक सक्रियपणे सहभाग नाेंदवतात. दरवर्षी सुमारे 20 टन रद्दी संकलित हाेते. असे फाऊंडेशनचे म्हणणे आहे.

निराधारांना साहित्याचे वितरण

रद्दी संकलनामुळे नागरिकांना भुर्दंडही पडत नाही आणि आणि गरीबांना मदतही हाेते. ही रद्दी विकून गोळा झालेला निधीतून गरजूंना आवश्यक ते साहित्य देण्यात येते. यंदाही असाच उपक्रम राबविण्यास प्रारंभ झाला असून, दिवाळीत निराधारांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. दुर्गम भागातील 1 हजार गरजूंना शैक्षणिक साहित्याच्या वितरणातून त्यांचे शैक्षणिक भवितव्य उजळण्याचा प्रयत्न जागर फाऊंडेशन करणार आहे.

यापूर्वी अशी केली मदत

जागर फाऊंडेशनतर्फे यापूर्वी निराधार महिलांना दळणयंत्र व शिवण यंत्राचे वितरण करण्यात आले हाेते. यंत्रासाठीची रक्कम 17 टन रद्दी संकलनातून उभी करण्यात आली हाेती. सात तालुक्यातील प्रत्येकी एका गरजू महिलेला यंत्राचे आणि एक शिलाई मशिनचे वितरण करण्यात आले. मुसळधार पावसामुळे उध्वस्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील गरजवंतांना जागरच्यावतीने 100 बैल देण्यात आले होते. या बैलांचे पशुपालकांना वाटप करण्यात आले होते. गतवर्षी 27 दिव्यांग व्यावसिकांना विक्रीसाठीचे साहित्य देण्यात आले हाेते.

येथे साधता येईल संपर्क

रद्दी संकलनासाठी जागर फाऊंडेशनकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. इकबाल हुसेन (निंबा) 8459367001, सुधीर फुलके (खडकी) 9881292965, समीर शिरवळकर (रामदास पेठ) 8788299766, तुलसिदास खिरोडकार (तेल्हारा) 9970276582, अनंत देशमुख (अकोट) 82089944017, मंगेश पुं. ताडे (चोहोट्टा) 9822820103, रूहुल्लाह खान (बार्शिटाकळी- 9923850299) यांच्याशी संपर्क करता येईल.