आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ईद सामाजिक सलोखा राखणे ही काळजी गरज; मिलन कार्यक्रमात उमटला सूर, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सहभाग

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सामाजिक सलोखा राखणे काळजी गरज आहे,’ असा सूर ईद मिलन कार्यक्रमात उमटला. कार्यक्रमाच राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शवसिेना, राष्ट्रवादी कांॅग्रेस नेत्यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवला. राज्यात भोंग्यांवरून राजकारण सुरू सताना सामाजिक एकोपा, आणख वाढवा आणखी घट्ट व्हावा, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष वजिय देशमुख यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला. सर्वधर्म समभावाचे वातावरण निर्मितीचा प्रयत्न यानिमित्ताने झाला.

याप्रसंगी आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आमदार प्रा.तुकाराम बिरकड, शाम बाबू अवस्थी, प्रा. विश्वनाथ कांबळे, शवसिेनेचे उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, कृष्णा अंधारे, सुरेश पाटील, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे, मोहम्मद रफीक सदि्दीकी, मुस्तफा पहलवान, साजदि खान पठान, चंदू सिरसाट, नितीन ताकवाले, निखिलेश दविेकर, रफीक कुरैशी, फैयाज खान, संतोष डाबेराव, महेश गणगणे, मनोज गायकवाड, अब्दुल अनीस, रहमान बाबू, डॉ. झिशान हुसेन, अब्दुल रहीम पेंटर, अशोक परळीकर मोहम्मद इरफान, याकूब पठान, मोहम्मद यूसुफ, अजय रामटेके, दिलीप देशमुख, नकीर खान, निखिलेश दविेकर, फरीद पहिलवान, अफसर कुरैशी, जब्बार भाई, सुधीर कहाकर, राजिक खान, पापाचंद्र पवार, हुसेन चौधरी, मुन्ना ठाकुर, यश सावल, रोहित देशमुख, शे. मुस्ताक, गजानन मुरुमकार, सोनू पठान, शहेजाद खान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुढन गाडेकर यांनी केले.

काय म्हणाले नेते ?

शिवसेना:- भोंग्यासारख्या विषयातून समाजविघातक शक्तींना बळी न पडता वाढती बेरोजगारी, महागाई आदी विषयावरील लक्ष विचलित करण्याचे प्रकार होत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे. या राजकारणाला योग्य वेळी उत्तर जनताच देईल, असे आमदार देशमुख म्हणाले.

काँग्रेस:- सध्या दोन समाजात द्वेष पसरवून आग लावण्याचे कार्य काही राजकारण्यांचे माध्यमातून मुठभर व्यक्ति करीत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून, सर्व गुण्या गोविंदाने सोबत राहत आहेत, असे माजी राज्यमंत्री अजहर हुसेन म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...