आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:कोरोनाचे आठ नवे रुग्ण; 31 जणांना डिस्चार्ज

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) १५५ अहवाल प्राप्त झाले. त्यात आठ जणांचा आरटीपीसीआर अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आला. मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

या सर्व महिला रुग्ण असून हे रुग्ण महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहे. जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५,२८५ आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३३ सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून, त्यातील सात जण रुग्णालयात दाखल तर अन्य २६ रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत.