आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. गायकवाडांनी थेट प्रसारमाध्यमांसमोर गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियातही व्हायरल होत आहे.
शिंदे गटाचे बुलढाण्याचे लोकप्रतिनीधी आक्रमक होताना दिसत आहेत. आदित्य ठाकरेंना आव्हान देणारे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांमध्ये वेगवेगळी वक्तव्यकरीत स्वतःकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत केले आहे. आजही संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी जहाल भाषा वापरली.
व्हिडीओ आला समोर
राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली आहे. त्यांनी राऊतांना थेट शिवी दिली. शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.
यापुढे अशी भाषा नको
संजय गायकवाड म्हणाले, “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे (शिवी...) संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचे की पडायचे, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे.
कुणाच्या किती जागा येतील बघू
संजय गायकवाड म्हणाले, तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिले होते. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे, पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू .
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊतांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिंदे गटावर निशाणा साधला. चित्रपटांमध्ये जसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असे कोरले गेले. तसेच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असे कोरले आहे. याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल.
वाघाचे कुणी शत्रू असतो का?
संजय गायकवाड म्हणाले, विरांचेच शत्रू असतात..वाघाचे कुणी शत्रू असतो का? मला त्याचा काही फरक पडत नाही. जी शिवसेना, काॅंग्रेस, युती आघाडीचे चालले असेल सच्चा बाळासाहेब ठाकरेकडील शिवसेनेचा हात काॅंग्रेसच्या चिन्हाकडे कधीच जाऊ शकत नाही. जरी गेला तर ते बाळासाहेबांची औलादच नाही.
जे सैनिक बाळासाहेबांना मानतात त्यांचा हात कधीच काॅंग्रेसकडे जाऊओ शकत नाहीत. जे काही बाळासाहेबांचे सैनिक नसतील, जे ठेकेदार असतील अशांना काही फरक पडत नाही ते कमर्शिअल आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.