आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:राजकीय आरक्षण रद्द होऊनही ओबीसींचा टक्का कायम! जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप, तर पंचायत समित्यांत काँग्रेसचे वर्चस्व

अकोला, वाशीम, नागपूर, धुळे, नंदुरबार13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जि.प.त भाजपला सर्वाधिक २२, तर पं.स.मध्ये काँग्रेसला ३६ जागा

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील ६ जिल्हा परिषदांचे ८५ गट आणि ३८ पंचायत समित्यांमधील १४४ गणांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसीच उमेदवार दिल्यामुळे ओबीसीचा टक्का कायम राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या ८५ पैकी ७८ गटांमध्ये ओबीसी उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, राज्यातील सहा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजे २२ जागा जिंकल्या आहेत. या पोटनिवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या, राष्ट्रवादी तिसऱ्या, तर शिवसेना चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने सर्वाधिक ३५ जागा जिंकून वर्चस्व राखले.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १४ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने १४ पैकी १३ उमेदवार ओबीसी प्रवर्गातील दिले होते. त्यापैकी ओबीसी प्रवर्गातील सहा उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजपचा १, काँग्रेसचा एक, शिवसेनेचा एक, प्रहार जनशक्ती पक्षाचा एक हे सर्व उमेदवार ओबीसी प्रवर्गातील आहेत. विजय झालेला दोन अपक्ष उमेदवारांना पैकी उमेदवार मात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. वाशीम जिल्ह्यात आहे १४ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीमध्ये विजय झालेले सर्व १४ उमेदवार ओबीसी प्रवर्गातील आहेत. येथे सुद्धा सर्व राजकीय पक्षांनी ओबीसींना उमेदवारी दिली. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये १६ जागांसाठी राजकीय पक्षांनी दिलेले सर्व ओबीसी प्रवर्गातील १६ उमेदवार विजयी झाले.

जि.प.त भाजपला सर्वाधिक २२, तर पं.स.मध्ये काँग्रेसला ३६ जागा
मुंबई | जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसला १९, राष्ट्रवादी काँग्रेसला १५, तर शिवसेनेला १२ जागा मिळाल्या आहेत. १२ ठिकाणी नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत, तर चार जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळून २५ टक्के जागा भाजपला, तर २५ टक्के जागा अपक्ष आणि छोट्या पक्षांना मिळाल्या आहेत. उरलेल्या ५० टक्क्यात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सामावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...