आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:निवडणूक मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, अकोट येथे नगरपालिका प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरीता प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे १७ प्रभागातील ३५ जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरपरिषदेच्या सभागृहात सोमवारी, १३ जूनला प्रभागनिहाय आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी श्री. गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढली. त्यांना न. प. मुख्यधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी सहकार्य केले. आता आरक्षण घोषित विविध प्रभागांत इच्छुकांची लगबग वाढणार आहे. तेल्हारा येथील १० प्रभागातील २० जागांचे आरक्षण जाहीर तेल्हारा। न.प.साठी उप जिल्हाधिकारी घुगे यांच्या उपस्थितीत प्रभाग आरक्षण काढले. येथे दहा प्रभाग असून, २० सदस्य आहे. त्यात तीन, सात सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी, याच दोन प्रभागातील दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी. ८, १० अनुसूचित जाती महिलांसाठी. यातील दोन जागा सर्वसाधारण आहेत एकमध्ये एक जागा आहे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव निघाली. प्रभाग १, ३, ७, ८ व १० वगळता इतर सर्व प्रभागांत प्रत्येक प्रभागात एक जागा ही महिलांसाठी राखीव निघाली असून, दुसरी जागा ही सर्वसाधारण आहे. बाळापूर येथील नगरपालिकेच्या १२ प्रभागातील २५ जागांचे आरक्षण जाहीर बाळापूर । येथील नगरपरिषद पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी, १३ जूनला प्रभाग आरक्षण सोडत काढली. येथील नगरपरिषदेत १२ प्रभाग असून, २५ जागा आहेत. सोडतीद्वारे निघालेल्या प्रभागनिहाय आरक्षणानुसार प्रभाग १ (ब) अनुसूचित जाती, प्रभाग ६ (अ) अनुसूचित जाती महिलासाठी राखीव निघालेला आहे.

सोडतीद्वारे निघालेले प्रभागनिहाय आरक्षण अकोट नगर परिषद प्र. क्र. अ ब १. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण २. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण ३. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण ४. अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण ५. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण ६. अनुसूचित जमाती महिला सर्वसाधारण ७. सर्वसाधारण महिला सर्व साधारण महिला ७ (क) सर्वसाधारण ८. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण ९. सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती १०. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण ११. सर्वसाधारण महिला सर्वसाधारण

बातम्या आणखी आहेत...