आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कर्मचाऱ्यांचा महावितरण, ग्राहकांना चूना:परस्पर लाखोंची वीजबिल वसुली; तिघे निलंबित; आतापर्यंत 17 कर्मचाऱ्यांवर कारवाई

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या अकोट विभागात कर्मचाऱ्यांनी ग्राहकांजवळून वीज बिल वसुली करून परस्पर लाखो रुपये हडप केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. यात आता पुन्हा 3 लाईनमन निलंबित करण्यात आले. आतापर्यंत विजबिल वसुली घोटाळ्यात 14 वीज कर्मचारी निलंबित झाले आहेत.

वसूलीचा स्वतःसाठी वापर

महावितरणमध्ये लाईनमन हा कंपनीचा महत्त्वाचा घटक असतो. काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे फसवणुकीचे संदेश ग्राहकांना प्राप्त होत असल्याने आणि बहुतांश ग्रामीण भागातील वीज असल्याने महावितरण ग्राहक कार्यालयात किंवा लाईनमन यांचाकडे वीज बिल भरणा करणे सुरक्षित समजतात. या विश्वासाचा गैरफायदा घेत काही लाईनमनने ग्राहकांकडून रक्कम घेऊन वीज बिलाचा ऑनलाईन भरणा करून रक्कम महावितरण कार्यलयात जमा न करता स्वतः वापरली.

नागरिकांमुळे प्रकरण उघडकीस

काही जागृत नागरिकांना बिल भरणा केल्यानंतरही प्रत्यक्षात वीज बिल भरले नसल्याचे समजले. त्यांनी तक्रार केली. यावरून लाईनमन फायदा करून कंपनी आणि ग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे नुकतेच उघडकीस आले. यासंदर्भात प्राप्त तक्रारीची शहानिशा करून महावितरणने ३ लाईनमनचे निलंबन केले. यापूर्वी सुध्दा विजबिल वसुली घोटाळा करणाऱ्या 14 लाईनमनला वीज बिलाचा रकमेचा अपहार केल्याकारणाने निलंबित केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यापूर्वी सुद्धा महावितरणने फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे.

रक्कम कोण भरणार?

ग्राहकांनी वीज भरले नाही तर वीज खंडीत केल्या जाते. मात्र, प्रकरणा ग्राहकांनी लाईनमनकडे वीजबिल जमा केले आहे. मात्र, कंपनीकडे ते पोहचले नाही. प्रकरणात लाईनमनवर कारवाई करण्यात आली. पण हे वीजबिल आता कोण भरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सध्यातरी कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...