आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोलेकरांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा:महान येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.

पुरवठा विभागाने दिली माहिती

अकोला पाणी पुरवठा योजनेचे अकोला येथून 32 किलो मिटर अंतरावर महान येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या ठिकाणी 65 एमएलडी आणि 25 एमएलडी क्षमतेचे दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत. 65 एमएलडी केंद्रातून 900 मिमी तर 25 एमएलडी केंद्रातून 600 मिमी व्यासाच्या जलवाहिनीने पाणी पुरवठा होतो. 600 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरुन शिवनगर येथील दोन, नविन बसस्थानका मागील दोन आणि आश्रय नगर या पाच जलकुंभाना पाणी पुरवठा होतो. तर 900 मिमी जलवाहिनीवरुन शहरातील उर्वरित जलकुंभाना पाणी पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्रातील पंप 24 तास सुरू असतात. त्यामुळेच पाणी पुरवठ्यात खंड पडु नये, यासाठी या ठिकाणी एक्स्प्रेस फिडरही लावण्यात आले आहे.

पुन्हा पाणीपुरवठा खंडीत

मात्र 10 सप्टेंबर रोजी रात्री शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील वीज रात्रीच खंडीत झाली होती. मात्र खंडीत झालेला वीज पुरवठा पुन्हा सुरु झाला. परंतु 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता पुन्हा वीज पुरवठा खंडीत झाला. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, मेजर फॉल्ट असल्याने दुरुस्तीच्या कामास वेळ लागणार आहे.

पूर्ववत व्हायला लागणार वेळ

परिणामी वीज पुरवठा पूर्ववत व्हायला काही तास लागतील, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. जलशुद्धीकरण केंद्रातून प्रथम जलकुंभ भरले जातात. जलकुंभ भरल्या नंतर पाणी पुरवठा सुरू केला जातो. वीज पुरवठा सुरु होण्यास विलंब लागणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला जाईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.

बातम्या आणखी आहेत...