आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजचोरी सुरूच:राज्यात वर्षभरात 317 कोटी रुपयांच्या वीजचोऱ्या उघड, तब्बल 557 दशलक्ष युनिट विजेची चोरी

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज गळती कमी करण्यासाठी महावितरणने आता वीजचोरांविरुध्द कंबर कसली असून सुरक्षा अंमलबजावणी विभागासोबत विभागीय स्तरावरील भरारी पथकांच्या माध्यमातून ही मोहीम अधिक प्रखरपणे राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2021-22 मध्ये तब्बल 557 दशलक्ष युनिट विजेची चोरी उघडकीस आणत महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या माध्यमातून ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

महसूलात वाढ होणार

उच्च व लघुदाब वर्गवारीमध्ये 22 हजार 987 ठिकाणी 317 कोटी 45 लाख रुपयांच्या वीजच्या उघडकीस आणल्या आहेत. त्यापैकी 172 कोटी 45 लाख रुपयांची वसुली झाली आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या या विक्रमी कामगीरीमुळे महावितरणची वीजहानी कमी करण्यासोबत महसुलामध्ये वाढ होण्यासाठी मदत होत आहे.

राज्यात 71 पथके सक्रीय

वीजचोरी विरोधात धडक कारवाईसाठी काम करणाऱ्या महावितरणमधील सुरक्षा व अंमलबजावणी विभागांतर्गत राज्यात परिमंडलस्तरावर 8, मंडलस्तरावर 20 तर विभागीयस्तरावर 40 असे एकूण 71 पथके असून यात सुमारे 345 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामधील मंडलस्तरावरील 20 पथके गेल्या नोव्हेंबर 2011 मध्ये नव्याने स्थापन करण्यात आली आहेत.

नियमित ग्राहकांवरील भार कमी होणार

ग्राहकांना पारदर्शक सेवा देण्यासाठी महावितरण प्रयत्नात आहे. त्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कृषीपंप वीजजोडणी धोरण-2020, सौर कृषिपंप योजना, विलासराव देखमुख अभय योजना, मीटर रिडींग व्यवस्थापन इत्यादिंचा समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून वीज गळती कमी करण्यासाठी महावितरणने आता वीजचोरांविरुध्द कंबर कसली आहे. यामुळे नियमित ग्राहकांवरील आर्थिक भार कमी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...